चोरीतील दुकाची पोलिसांनी केली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:24 AM2021-07-07T04:24:55+5:302021-07-07T04:24:55+5:30
.... पिके कोमेजू लागल्याने शेतकरी हवालदिल अंधोरी : पावसाने उघडीप दिल्याने अंधोरी व परिसरातील खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. ...
....
पिके कोमेजू लागल्याने शेतकरी हवालदिल
अंधोरी : पावसाने उघडीप दिल्याने अंधोरी व परिसरातील खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. उगवलेली कोवळी पिके कोमेजू लागली आहेत. मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. महागडे बी-बियाणे, खते खरेदी करून पेरणी केली होती. पिकेही चांगली उगवली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. मात्र, १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे.
...
सव्वा लाखाची चोरी, किनगावात गुन्हा दाखल
अंधोरी : किनगावातील एका बारवरील सव्वा लाखाची चोरी झाल्याची घटना शनिवारी घडली. फिर्यादी कल्याण बदणे (रा. देवकरा) यांचे वडील आजारी असल्याने ते उपचारासाठी लातूरला गेले होते तेव्हा आरोपीने १ लाख २५ हजार रुपये पळविले. याप्रकरणी किनगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. डोईजड हे करत आहेत.
...
जाधव यांचा वर्ल्ड सायंटिस्ट युनिव्हर्सिटीत समावेश
उदगीर : अमेरिकेतील अल्पर डोझर सायंटिफिक इंडेक्सने वर्ल्ड सायंटिस्ट ॲण्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१ जाहीर झाली आहे. त्यात येथील शिवाजी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजयकुमार जाधव यांचा समावेश आहे. यापूर्वी त्यांनी आयर्लंड येथे पोस्ट डॉक्टर फेलोशिप या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून संशोधन कार्य केले आहे तसेच त्यांनी साऊथ कोरिया, इस्राईल, इटली व चीन आदी देशांत जाऊन संशोधन कार्य केले होते. याबद्दल त्यांचे कौतुक किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी अरविंद पाटील एकंबेकर, प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जगताप, डॉ. आर. एम. मांजरे आदींनी केले.
...
संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश करावा
अहमदपूर : देशभरातील शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा अनिवार्य विषय म्हणून समावेश करावा, अशी मागणी डॉ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे केली आहे. माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने नुकतीच दिल्लीत मंत्री धोत्रे यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात चाकूर शहराध्यक्ष प्रशांत बिबराळे, शिवशंकराप्पा काळगे, रवी पाटील आदींचा समावेश होता.
...