खबऱ्याने फाेडले गुटख्याचे बिंग; पोलिस पथकाचे छापे, दाेघे जाळ्यात..!
By राजकुमार जोंधळे | Published: February 11, 2023 07:04 PM2023-02-11T19:04:13+5:302023-02-11T19:05:02+5:30
या छाप्यात पोलिसांनी दहा लाखांचा साठा जप्त केला आहे
लातूर : अहमदपूर शहरासह परिसरातील काहीजण गुटखा आणि सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री करत असून, त्यासाठी माेठ्या प्रमाणावर साठा केल्याची माहिती खबऱ्याने पाेलिस अधिकाऱ्यांना दिली. या माहितीच्या आधारे पाेलिस पथकाने अहमदपुरात छापे टाकले असून, दाेघांना अटक केली आहे. यावेळी तब्बल ९ लाख ९१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात चारजणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, लातूर शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिले आहेत. त्यानुसार अहमदपूर-चाकूर तालुक्यातील अवैध व्यवसायाची माहिती संकलित करण्याचे काम पाेलिस करत हाेते. दरम्यान, अहमदपूर शहरासह तालुक्यात काहीजण गुटखा आणि सुगंधित तंबाखूची चाेरट्या मार्गाने विक्री करत असल्याची माहिती खबऱ्याने सहायक पाेलिस अधीक्षक निकेतन कदम यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी अहमदपुरात एकाचवेळी छापे टाकले. यावेळी चाैघांनी साठा करून ठेवलेला तब्बल ९ लाख ९१ हजारांचा गुटखा व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात विठ्ठल गुरुलिंग हामणे (वय ४६, रा. भाग्यनगर, अहमदपूर), बबन बाबू पठाण (रा. अहमदपूर), राजू ऊर्फ शिवलिंग गुरुलिंग हामणे (रा. अहमदपूर) आणि शंकर कानगुले (रा. अहमदपूर) यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. यातील दाेघांना पाेलिसांनी अटक केली असून, दाेघेजण निसटले आहेत. त्यांचा पाेलिस शाेध घेत आहेत. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक रोकडे, अंमलदार कलमे, पुठेवाड, बाळासाहेब साळवे, बापूराव धुळगुंडे, सुदर्शन घुगे, आरदवाड, रत्नदीप कांबळे यांच्यासह पथकाने केली.