रेकाॅर्डवरील साडेसात हजार गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘वॉच’! अनेकांना केले स्थानबद्ध, पाच जणांवर तडीपारीची कारवाई

By राजकुमार जोंधळे | Published: September 17, 2023 11:36 PM2023-09-17T23:36:32+5:302023-09-17T23:37:51+5:30

तडीपारीचे सातपैकी पाच प्रस्ताव निकाली काढले आहेत तर दाेन प्रस्ताव रद्द झाले आहेत.

Police watch on seven and a half thousand criminals on record Many people were arrested, action was taken against five people | रेकाॅर्डवरील साडेसात हजार गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘वॉच’! अनेकांना केले स्थानबद्ध, पाच जणांवर तडीपारीची कारवाई

रेकाॅर्डवरील साडेसात हजार गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘वॉच’! अनेकांना केले स्थानबद्ध, पाच जणांवर तडीपारीची कारवाई

googlenewsNext

लातूर : गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर पाेलिसांनी जिल्ह्यातील एकूण २३ पोलिस ठाण्यांच्या रेकाॅर्डवर असलेल्या गुन्हेगारांची माहिती संकलित केली असून, आता त्यांच्या हालचालींवर पाेलिसांची नजर आहे. सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी तब्बल ७ हजार ४५८ गुन्हेगारांविराेधात विविध कलमांनुसार कारवाई केली आहे. तडीपारीचे सातपैकी पाच प्रस्ताव निकाली काढले आहेत तर दाेन प्रस्ताव रद्द झाले आहेत.

लातूर शहरासह जिल्ह्यातील एकूण सहा उपविभागांतील २३ पाेलिस ठाण्यांच्या रेकाॅर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा डेटा दाेन महिन्यांपासून एकत्र केला आहे. यातील सराईत गुन्हेगारांची कुंडली डाेळ्यासमाेर ठेवत पाेलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या काळात कलम १०७ अन्वये तब्बल ५ हजार ६९६ जणांवर कारवाई केली आहे. कलम १०९ अन्वये ९०, कलम ११० अन्वये ३३८, कलम ११२ माेक्कानुसार ९८ जणांविराेधात कारवाई केली आहे. तर ९३ जणांविराेधात दारूबंदी कायद्यानुसार खटले दाखल केले आहेत.

संवेदनशील गावांत अतिरिक्त बंदाेबस्त...
लातूर जिल्ह्यातील संवदेनशील गावांमध्ये यंदाही अतिरिक्त पाेलिस बंदाेबस्ताचे नियाेजन केले आहे. या गावांना प्रत्यक्ष वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन शांतता बैठक घेतली आहे. कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

डीजेमुक्तीचा असाही ‘लातूर पॅटर्न’...
यंदा सण-उत्सवांबराेबरच गणेशाेत्सव डीजेमुक्त साजरा करण्याचा संकल्प पाेलिसांनी केला आहे. यासाठी गत महिनाभरापासून गावागावात प्रबाेधन, जागृती केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असून, डीजे, डाॅब्लीसह वाहन जप्त केले जाणार आहे. - साेमय मुंडे, जिल्हा पाेलिस अधीक्षक, लातूर

‘एमपीडीए’नुसार दाेघांची तुरुंगवारी...
लातूर पाेलिसांनी महाराष्ट्र झाेपडपट्टी दादा कायद्यानुसार (एमपीडीए) दाेघांवर कारवाई करत त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. सराईत असलेल्या गुन्हेगारांवर माेक्का, तडीपारीचीही कारवाई करण्यात आली आहे. १०७ कलमानुसार ५ हजार ६९६ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. आता त्यांच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांचा ‘वाॅच’ राहणार आहे.

या कलमानुसार केली कारवाई...
कलम  आराेपी संख्या
१०७ - ६५८२
१०९ - ९०
११० - ३३८
११२ - ९८
९३ - ५६२
 

Web Title: Police watch on seven and a half thousand criminals on record Many people were arrested, action was taken against five people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस