पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:19 AM2021-04-24T04:19:15+5:302021-04-24T04:19:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या काळात पोलिसांवरील ताण पुन्हा वाढला आहे. रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य पोलीस बांधवांना पार पाडावे लागत आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ४०६ पोलीस अधिकारी, कर्मचारी तर ४५ होमगार्ड्सना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सध्या ११६ पोलीस कोरोनाबाधित आहेत. यामध्ये पोलीस अधिकारी ८, पोलीस अंमलदार ८६ तर २२ होमगार्ड्सचा समावेश आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना काळजी असते. विविध ठिकाणी कर्मचारी आपले कर्तव्य बजावतात. याचदरम्यान त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. सर्वांनी काळजी घ्यावी. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले.
माझे बाबा पोलीस आहेत. कोरोनाकाळातही त्यांना सेवा द्यावी लागत आहे. घरून कर्तव्यावर जाताना मास्क, फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या मी सूचना करते. आम्ही कुटुंबीयांचीही पूर्णपणे काळजी घेत आहोत.
पप्पा, ड्यूटीवर जात असताना पुरेपूर काळजी घेतात. घरी आल्यानंतर आंघोळ करतात. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आम्ही वडिलांसोबत कुटुंबाची काळजी घेत आहोत. नागरिकांनीही आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी.
गेल्या वर्षभरापासून माझे बाबा कोरोनाकाळात सेवा देत आहेत. आम्हीही पूर्ण काळजी घेत आहोत. बाबा, ड्यूटीला जात असताना त्यांना मास्क वापरण्याच्या सूचना वेळोवेळी करतो. उपाययोजनांचे प्रत्येकांनी पालन करणे गरजेचे आहे.
माझे बाबा दररोज ड्यूटीवर जातात. आम्हाला चिंता वाटते. मात्र बाबा पूर्णपणे काळजी घेतात. आम्हालाही वेळोवेळी सूचना करतात. कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, हीच इच्छा आहे. उपाययोजनांचे पालन करण्याबाबत वडिलांना सांगत असतो.