लातुरात पाेलिसांचे ‘काेम्बिंग ऑपरेशन’ कारवाई : दाेन तासात ६२ वाहनांवर खटले...

By राजकुमार जोंधळे | Published: June 9, 2023 09:59 PM2023-06-09T21:59:25+5:302023-06-09T21:59:37+5:30

यावेळी पाेलिस पथकांनी काही टवाळखाेरांची धरपकड केली. त्यांना चांगलाच चाेप दिला आहे.

Police's 'combing operation' action in Latur: cases against 62 vehicles in two hours | लातुरात पाेलिसांचे ‘काेम्बिंग ऑपरेशन’ कारवाई : दाेन तासात ६२ वाहनांवर खटले...

लातुरात पाेलिसांचे ‘काेम्बिंग ऑपरेशन’ कारवाई : दाेन तासात ६२ वाहनांवर खटले...

googlenewsNext

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील उद्याेगभवन, सूतमील राेड परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काेम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. केंद्रीय माेटार वाहतूक कायद्यानुसार ६२ वाहनधारकांवर पाेलिसांच्या वतीने खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ४३ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.

ही कारवाई शुक्रवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या दाेन तासात करण्यात आली आहे. तर काही जण हाॅटेल, ठेल्यावर तंबाखू, धुम्रपान करताना आढळून आल्याने ११ जणांविराेधात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थविराेधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना ५ हजार ५०० रुपयांचा दंड केला करण्यात आला आहे. यावेळी पाेलिस पथकांनी काही टवाळखाेरांची धरपकड केली. त्यांना चांगलाच चाेप दिला आहे.

खासगी शिकवणी परिसरात एका काॅफी सेंटरचीही पाेलिस पथकाने अचानकपणे छापा मारुन झाडाझडती घेतली असून, काही युवकांना ताब्यात घेतले. दरम्यान, ट्रीपलसीट वाहन चालविणाऱ्यांना पाेलिसांनी दंडुक्याचाही प्रसाद दिला आहे. यावेळी लातूर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, गांधी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे, शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक गाेरख दिवे यांच्यासह दहा पोलिस अंमलदार, वाहतूक नियंत्रण शाखेचे सह पोलिस अंमलदार, दामिनी पथकाचे कर्मचारी हजर होते.

Web Title: Police's 'combing operation' action in Latur: cases against 62 vehicles in two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.