खासगीकरणाच्या विरोधात टपाल कर्मचारी आक्रमक; लातुरात केले धरणे आंदोलन
By संदीप शिंदे | Published: August 10, 2022 02:15 PM2022-08-10T14:15:48+5:302022-08-10T14:16:28+5:30
टपाल खात्यातील रिक्त असलेल्या जागा तातडीने भराव्यात
लातूर : नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह खासगीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी लातूर शहरातील गांधी चौक पोस्ट ऑफिस समोर टपाल कर्मचाऱ्यांच्या वतीने बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
टपाल खात्यातील रिक्त असलेल्या जागा तातडीने भराव्यात, कोरोनामुळे निधन झालेल्या टपाल विभागातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची मदत करावी, कुटूंबातील सदस्यास अनुकंपावर नोकरी द्यावी, टपाल व आरएमएस विभागात पाच दिवसांचा आठवडा करावा, कोविड काळातील थकीत महागाई भत्ता वितरित करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष दिनकर शिंदे, सचिव मोहन सोनटक्के, बाबूशा माळी, अतुल बिराजदार, अमोल रेड्डी, व्ही.एन. पाटील, पी.एन. कोटकर, ए. बी. चरपळे, जे.एन. कदम, अजय बोयणे, दीपक साबळे, भागवत खोत, जी.डी. कांबळे, स्वप्नील चौधरी, चंदनकुमार, शंकर दिवटे, सूर्यभान भडके, सहदेव वाघमारे, शिवराज काळवणे आदींसह संघटनेचे पदाधिकारी सहभागी होते.