चाकूरातील राष्ट्रीय महामार्गाची चाळण; खड्ड्यांमुळे अपघात वाढले, धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले

By संदीप शिंदे | Published: August 22, 2023 01:26 PM2023-08-22T13:26:54+5:302023-08-22T13:27:11+5:30

चाकूर ते लातूररोड दरम्यान आणि चाकूर ते शासकीय विश्रामगृह या मार्गावर वाहने चालविणे तारेवरची कसरत झाली आहे.

potholes on National Highway passing through Chachur; Passengers' health is at risk due to dust | चाकूरातील राष्ट्रीय महामार्गाची चाळण; खड्ड्यांमुळे अपघात वाढले, धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले

चाकूरातील राष्ट्रीय महामार्गाची चाळण; खड्ड्यांमुळे अपघात वाढले, धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले

googlenewsNext

चाकूर : तालुक्यातून रत्नागिरी-नागपूर महामार्ग जात असून, काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, लातूररोड पासून चाकूर शहर ते अलगरवाडी फाटापर्यंत रस्त्याची चाळणी झाली आहे. अनेकदा खड्डे बुजविण्यात आले असले तरी निष्कृष्ट कामामुळे परत खड्डे पडत आहेत. त्यातच धुळीचा त्रास वाढल्याने वाहनचालक, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

चाकूर ते लातूररोड दरम्यान आणि चाकूर ते शासकीय विश्रामगृह या मार्गावर वाहने चालविणे तारेवरची कसरत झाली आहे. विश्रामगृह, जूने बसस्थानक, शहरानजिकचे पूल, पुढे पेट्रोल पंप, न्यायालय, तहसील येथील बसस्थानक तर विश्वशांतीधाम मंदीर, चाकूर ते अलगरवाडी फाटा या भागातही रस्त्याची अवस्था दयनिय झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर लाखों रूपयाची उधळपट्टी झाली. मात्र, रस्ते मात्र दुरुस्त झालेच नाहीत. या रस्त्यावर हॉट मिक्सचे काम करण्यासाठी निविदा काढून कोटीचे उधळपट्टी झाली तरी रस्ता जैसे थे आहे.

शहरानजिक ओद्योगिक वसाहतीचे दोन रस्ते आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेल्याने या भागातून जाणारी वाहने औद्योगिक वसाहतीतील रस्त्याचा वापर करत आहेत. क्षमतेपेक्षा अधिक वाहने या रस्त्यावर धावू लागली आहेत. त्यामुळे हाही रस्ता खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने दुरुस्तीची मागणी आहे.

मर्यादेपेक्षा जास्त धुळीचे प्रमाण...
या रस्त्यावर धूळीचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे दमा, खोकला, ॲलर्जी यासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रवास करताना धुळीपासून संरक्षण होईल. याची काळजी प्रवासी वर्गाने घ्यावी. 
- डॉ. दीपक लांडे, वैद्यकिय अधीक्षक

एमआयडीसीचा रस्ता खराब होतोय...
औद्योगिक वसाहतीचा रस्ता हा वाहतुकीसाठी नाही. तो फक्त वसाहतीतील उद्योजकांसाठी आहे. सध्या वहसातीतील रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. जड वाहने, वाळूची टिपर भरधाव वेगात धावत आहेत. त्यामुळे नव्याने केलेला रस्ता खराब होत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी आमच्याकडे निधी नाही. 
- करिमसाब शेख, चेअरमन औद्योगिक वसाहत

रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात वाढले...
वाहनांचा आम्ही रोड टॅक्स भरुनही रस्ते व्यवस्थित नाहीत. राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था दयनिय झाली आहे. दुरुस्तीसाठी संबंधित विभागाचे लक्ष नाही. परिणामी, आम्हाला या खराब रस्त्यामुळे वाहनाचे मेंन्टनस मोठ्या प्रमाणावर करावे लागते शिवाय अपघात वाढले आहेत. - प्रविण मुंडे, चालक

महामार्ग प्राधिकरणाला सुचना करणार...
लातूररोड ते चाकूरमार्गे आलगरवाडी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडली आहेत. धुळ मोठ्या प्रमाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुचना देऊन या समस्या सोडविण्यात येतील. अन्यथा कायदेशीर कारवाई करणार आहे. 
- रेणुकादास देवणीकर, तहसीलदार

Web Title: potholes on National Highway passing through Chachur; Passengers' health is at risk due to dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.