उज्ज्वल भारत घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:21 AM2021-09-27T04:21:11+5:302021-09-27T04:21:11+5:30

पंचायत समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कोविडमुळे मागील दोन वर्षांपासून शिक्षक पुरस्कार ...

The power to create a brighter India is in the hands of teachers | उज्ज्वल भारत घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांच्या हाती

उज्ज्वल भारत घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांच्या हाती

googlenewsNext

पंचायत समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कोविडमुळे मागील दोन वर्षांपासून शिक्षक पुरस्कार कार्यक्रम घेण्यात आला नव्हता. शुक्रवारी येथील मोरया लाॅन्सच्या सभागृहात ३९ शिक्षकांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती डॉ. नरेश चलमले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा भारतबाई साळुंखे, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंदराव चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, शिक्षण समिती सदस्या कुसुमताई हालसे, ॲड. जयश्रीताई पाटील, उपसभापती उद्धवराव जाधव, वर्षाताई भिका, संजय दोरवे, डाएटचे प्राचार्य राजेंद्र गिरी, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण, शिवाजी यमुलवाड, गटशिक्षणाधिकारी अनिल पागे, निशिकांत मिरकले, गोवर्धन चपडे आदींची उपस्थिती होती.

गटशिक्षणाधिकारी अनिल पागे यांनी प्रास्ताविक केले. शंकर स्वामी, अनंत डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते.

अशैक्षणिक कामे कमी करणार...

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, शिक्षकांना वेगवेगळी अशैक्षणिक कामे लावली जात असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा केली जाते; परंतु शिक्षकांना पूर्णवेळ अध्यापनाचे कार्य करू दिले पाहिजे. शिक्षकांची इतर कामे कमी करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The power to create a brighter India is in the hands of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.