गरोदर महिलांनाही आता घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:24 AM2021-07-07T04:24:39+5:302021-07-07T04:24:39+5:30
लस घेण्यापूर्वी ही घ्या काळजी गरोदर महिलांना कोणत्याही महिन्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेता येईल. मात्र लस घेण्याअगोदर पोटात दुखत ...
लस घेण्यापूर्वी ही घ्या काळजी
गरोदर महिलांना कोणत्याही महिन्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेता येईल. मात्र लस घेण्याअगोदर पोटात दुखत असेल, ताप आला असेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरांना ती माहिती देणे आवश्यक आहे.
एचबी नॉर्मल असावा. इन्फेक्शन होत असेल तर त्याची माहिती डॉक्टरांना द्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लस घ्यायला हरकत नाही.
कोरोना नियमांचे पालन करावे. नियमित मास्क वापरावा. हात वारंवार धुवावेत. सुरक्षित अंतर पाळावे, गरोदर मातांसह सर्वांसाठीच ही लस उपयुक्त आहे.
१८ वर्षांपुढील गरोदर माता कोणत्याही महिन्यात लस घेऊ शकतात. मात्र ताप किंवा अन्य कोणती लक्षणे असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण हा एकमेव मार्ग असून, तो गरोदर मातांनाही उपयुक्त आहे.
- डॉ. कल्याण बरमदे, स्त्रीरोग तज्ज्ञ
शक्य तितक्या लवकर लस घेणे आवश्यक आहे. त्यातून रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. लस माता आणि बाळांसाठी सुरक्षित आहे, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
- डॉ. एल.एस. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक