निवडणूक मतमोजणीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:02 AM2021-01-08T05:02:48+5:302021-01-08T05:02:48+5:30
निवडणूक कामासाठी साहित्य वाटप व स्वीकृतीसाठी १०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांनी १४ जानेवारी रोजी प्रत्यक्ष ...
निवडणूक कामासाठी साहित्य वाटप व स्वीकृतीसाठी १०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांनी १४ जानेवारी रोजी प्रत्यक्ष काम कसे करावे, यासाठी मंगळवारी प्रशिक्षण पार पडले. दुसरे प्रशिक्षण १३ जानेवारी रोजी होणार आहे, तसेच ५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले. १ ते १८ टेबलवरून १८ जानेवारी रोजी सकाळी १० वा. मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी ११३ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
दुसरे प्रशिक्षण १७ जानेवारी रोजी होणार असून, साहित्य देवाण-घेवाण व मतमोजणीबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे, निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे, नायब तहसीलदार प्रज्ञा कांबळे, नायब तहसीलदार राजेश बेंबळगे यांनी दिली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी, मास्टर ट्रेनर, मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.