लातूर शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:24 AM2021-07-07T04:24:50+5:302021-07-07T04:24:50+5:30
लातूर : शहरासह जिल्ह्यातील काही भागात साेमवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. लातूर शहरात जवळपास एक तास पाऊस झाला. त्यामुळे ...
लातूर : शहरासह जिल्ह्यातील काही भागात साेमवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. लातूर शहरात जवळपास एक तास पाऊस झाला. त्यामुळे काही भागातील रस्त्यांवर पाणी वाहत हाेते तर जुना औसा राेड परिसरातील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने एकच तारांबळ उडाली. जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा साेमवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमधून समाधान व्यक्त हाेत आहे.
लातूर जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर पावसाने जाेरदार हजेरी लावली हाेती. याच पावसाच्या भरवशावर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ केला. सध्या जिल्हाभरात ७० टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या झाला असून, सर्वाधिक पेरा हा साेयाबीनचा आहे. अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने ३० टक्क्यांवर पेरण्या खाेळंबल्या आहेत. साेमवारी झालेल्या जाेरदार पावसाने जिल्ह्यातील पेरण्यांना पुन्हा गती मिळणार आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरासह तालुक्यातील हलगरा, सावरी, अनसरवाडा, तळीखेड, औराद शहाजानी परिसरातही या पावसाने हजेरी लावली. औसा तालुक्यातील बेलकुंड, शिवली, आशिव, माताेळा परिसरातही पाऊस झाला.
रेणापूर, अहमदपूर, उदगीरात ढगांची गर्दी...
लातूर शहरासह औसा, निलंगा तालुक्यात पावसाने साेमवारी दुपारनंतर हजेरी लावली. रेणापूर, अहमदपूर, उदगीर, जळकाेट आणि देवणी तालुक्यात केवळ ढगांनी गर्दी केली हाेती. मात्र, पाऊस झाला नाही. रेणापूर येथे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तुरळक पाऊस झाला. तालुक्यात केवळ आभाळ भरुन आले हाेते तर काही ठिकाणी जाेराचा वारा सुटला हाेता. लातूर, औसा आणि निलंगा तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे.