अधिकारी असल्याची बतावणी करुन वृद्धाच्या दोन अंगठ्या पळविल्या

By हरी मोकाशे | Published: April 6, 2023 07:20 PM2023-04-06T19:20:50+5:302023-04-06T19:22:09+5:30

चाकूरची घटना : चोरटे दुचाकीवरून पसार

Pretending to be an officer, they stole two thumbs of the old man | अधिकारी असल्याची बतावणी करुन वृद्धाच्या दोन अंगठ्या पळविल्या

अधिकारी असल्याची बतावणी करुन वृद्धाच्या दोन अंगठ्या पळविल्या

googlenewsNext

चाकूर : अधिकारी असल्याची बतावणी करुन एका ६६ वर्षीय व्यक्तीच्या हातातील अंगठ्या अज्ञाताने कागदावर घेतल्या. पंचनामा करण्याचा बहाणा करीत कागदात एक दगड टाकून त्या अंगठ्या असल्याचे भासविले आणि अंगठ्या घेऊन पोबारा केल्याची घटना शहरातील राष्ट्रीय मार्गालगतच्या एका हॉटेलजवळ गुरुवारी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास घडली.

चाकुरातील भगवान हणमंतराव करेवाड हे पत्नी, मेहुणीसह धार्मिक कार्यक्रम आटोपून गुरुवारी दुपारी चालत घराकडे निघाले होते. येथील राष्ट्रीय महामार्गलगतच्या एका हॉटेलजवळ ते आले असता त्यांना अज्ञातांनी अडविले. अंगावर एवढे सोने घालून फिरायचे नसते. आम्हाला लातूर कार्यालयातून पाठविले आहे, असे सांगून एक ओळखपत्र दाखविले. त्यानंतर तुमच्या अंगावरील सोने काढून या कागदावर ठेवा. त्याचा पंचनामा करायचा आहे, अशी बतावणी करीत करेवाड यांना भुरळ पाडली. तेव्हा करेवाड यांनी हातातील ७ ग्रॅम व तीन ग्रॅमच्या अशा दोन अंगठ्या काढून कागदावर ठेवल्या.

तेव्हा अज्ञाताने छोटासा दगड असलेला दुसरा एक कागद करेवाड यांच्या खिशात टाकला. तेव्हा आपली फसवणूक होत आहे, हे लक्षात येताच करेवाड यांनी त्या अज्ञातांच्या गच्चीला पकडले. तेव्हा त्या अज्ञातांनी झटका देत सुटका करून घेतली आणि तेथून ते चौघेजण मुख्य रस्त्याने दोन दुचाकीवरून नांदेडच्या दिशेने पसार झाले. दरम्यान करेवाड यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु ते चौघेही काही क्षणात पसार झाले. याप्रकरणी पोलिसात तक्रार देणार असल्याचे भगवान करेवाड यांनी सांगितले.

Web Title: Pretending to be an officer, they stole two thumbs of the old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.