मिरवणुकीत युवकाचा भाेसकून खून; आराेपीला पाेलिस काेठडी

By राजकुमार जोंधळे | Published: February 4, 2023 05:51 PM2023-02-04T17:51:15+5:302023-02-04T17:52:16+5:30

धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून युवकाचा खून

Pretense murder of youth in procession; Police custody of the accused | मिरवणुकीत युवकाचा भाेसकून खून; आराेपीला पाेलिस काेठडी

मिरवणुकीत युवकाचा भाेसकून खून; आराेपीला पाेलिस काेठडी

Next

लातूर : संदल मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून युवकाचा चाकू भाेसकून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली हाेती. दरम्यान, आराेपीला पाेलिसांनी अटक केली आहे. त्याला लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरात गुरुवारी रात्री संदल मिरवणूक निघाली हाेती. दरम्यान, या मिरवणुकीत माेठ्या प्रमाणावर तरुण नाचत हाेते. यावेळी धक्का लागल्याच्या कारणावरून फैजान आरीफ कुरेशी (वय १८, रा. भाेई गल्ली, दायानंद राेड, लातूर) याच्यामध्ये आणि जैद जाहेद सय्यद (रा. बाैद्धनगर, लातूर) यांच्यामध्ये शिवीगाळ, बाचाबाची झाली. या वादातूनच जैद सय्यद याने फैजान आरीफ कुरेशी याच्या पाेटात चाकू खुपसून खून केला. ही घटना लातुरातील ताजाेद्दीन बाबा दर्गा राेड, लातूर येथील एका जिमसमाेर घडली. घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. घटनास्थळी अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, लातूर शहर उपविभागीय पाेलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

घटनेनंतर पाेलिसांनी तातडीने बंदाेबस्त तैनात करण्यात आला. रात्री उशिरात मयत युवकाचा भाऊ रेहान आरीफ कुरेशी (वय २०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी आराेपीला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्याला लातूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने चार दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.

Web Title: Pretense murder of youth in procession; Police custody of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.