साेयाबीनचे दर सहा हजारांवर; शेतकरी म्हणतात, काय करू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:22 AM2021-09-26T04:22:35+5:302021-09-26T04:22:35+5:30
लातूरच्या बाजार समितीमध्ये शनिवारी एकूण ३ हजार ९९६ क्विंटलची आवक झाली आहे. साेयाबीनला कमाल दर ७ हजार २० रुपयांचा ...
लातूरच्या बाजार समितीमध्ये शनिवारी एकूण ३ हजार ९९६ क्विंटलची आवक झाली आहे. साेयाबीनला कमाल दर ७ हजार २० रुपयांचा मिळाला आहे. किमान दर ५ हजार ९०० रुपयांचा तर सर्वसाधारण दर हा ६ हजार ८६० रुपयांचा मिळाला आहे. गतवर्षी हाच दर ३ हजार ६५० रुपयांच्या घरात हाेता. यंदा या दरामध्ये माेठ्या प्रमाणावर वाढ झाली हाेती. मात्र, बाजारात नवीन साेयाबीनची आवक हाेताच, दर माेठ्या प्रमाणावर घसरले. सध्याला प्रतिक्विंटलमध्ये ४ हजारांची तफावत आहे. जानेवारी २०२० मध्ये प्रतिक्विंटल ४ हजार २७० रुपये दर मिळाला हाेता. जून - २०२० मध्ये ३ हजार ६७० रुपयांचा भाव मिळाला. जून - २०२० मध्ये ७ हजार १०० रुपये भाव मिळाला. ऑक्टाेबर - २०२० मध्ये ३ हजार ६२० रुपयांचा भाव मिळाला. जुलै २०२१ मध्ये हाच भाव दहा हजारांवर गेला हाेता.
खाेऱ्याने पैसा ओतला, आता काय करू?
गेल्या काही वर्षांपासून माेठ्या प्रमाणावर साेयाबीनची लागवड करत आहे. यातून नफा मिळेल असे वाटले. मात्र, यंदा साेयाबीनचे दर घसरले आणि माेठा आर्थिक फटका सहन करावा लागला. शेतकऱ्यांकडे ज्यावेळी साेयाबीन हाेते त्यावेळी जेमतेम दर हाेते. आता शेवटच्या टप्प्यात साेयाबीन बाजारात आले, त्यावेळी हाच भाव दहा हजारांवर गेला हाेता. यंदाही नवीन साेयाबीन बाजारात दाखल झाले आहे. मात्र, प्रतिक्विंटल चार हजारांची घसरण झाली आहे.
- अंबादास चिकले, वाढवणा
ज्वारी, सूर्यफूल, मूग आणि उडदाची लागवड कमी करून साेयाबीनचा पेरा सर्वाधिक घेतला. साेयाबीनच्या माध्यमातून आर्थिक फायदा हाेईल, या उद्देशाने ही लागवड केली हाेती. मात्र, गतवर्षीच्या साेयाबीनला ४ हजार २७० रुपयांच्या घरात दर मिळाला. यंदा जुलै महिन्यात दहा हजारांचा भाव मिळाला. मात्र, त्यावेळी माझ्याकडे साेयाबीन नव्हते. मी ते काढल्यानंतर लागलीच विक्रीला आणले हाेते. प्रतिक्विंटलला जवळपास ७ हजारांचा दर मिळाला.
- हणमंतराव मुळे, उदगीर
विकण्याची घाई करू नका..!
ज्यावेळी साेयाबीनची काढणी हाेते, त्यावेळी तातडीने शेतकऱ्यांनी आपले साेयाबीन विकण्याची घारू करू नये, याेग्य भाव आल्यानंतरच घरातील साेयाबीन विक्रीसाठी बाजारात आणावे. यातून आपल्याला आर्थिक फटका सहन करावा लागणार नाही. बाजारातील दराबाबत प्रत्येकाने जागरुक राहिले पाहिजे.
- अडत व्यापारी
बाजारातील उलाढाल, भाव आणि आवक यांचा अभ्यास करून साेयाबीन विक्रीसाठी आणले पाहिजे. बाजारातील चढउतारांचा अंदाज नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कमी दरात साेयाबीनची विक्री करावी लागते. यातून प्रतिक्विंटलला माेठे आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ येते. त्यासाठी बाजारातील दराकडे लक्ष देत साेयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा.
- अडत व्यापारी