७४ वर्षांनी सुटला ४ किमीच्या रस्त्याचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:19 AM2021-08-01T04:19:18+5:302021-08-01T04:19:18+5:30
गायमाळ तांडा ते रामघाट तांडा या रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून होता. त्यामुळे नागरिकांना ये- जा करताना अडचणींचा सामना करावा ...
गायमाळ तांडा ते रामघाट तांडा या रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून होता. त्यामुळे नागरिकांना ये- जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असे. दरम्यान, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी शनिवारी मोकळा करून दिला. या रस्त्याबाबत मागील बऱ्याच दिवसांपासून आंदोलने, उपोषण करण्यात येत होते. तांड्यातील नागरिकांना रस्ता नसल्यामुळे दळणवळण, वाहतूक व आरोग्यविषयक अडचणींना सामना करावा लागत होता. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी हा चार किमी लांबीच्या रस्त्याचे खोदकाम करून मजबुतीकरण केले आहे. त्यामुळे रामघाट तांड्यावरील नागरिक आनंदित झाले आहेत. यावेळी ॲड. शिवाजी राठोड, तानाजी राठोड, मंडळाधिकारी गणेश हिवरे, तलाठी किशोर पाटील यांच्यासह तांड्यातील नागरिक उपस्थित होते.