वादळी वाऱ्यापासून झाडांना वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:18 AM2021-05-17T04:18:05+5:302021-05-17T04:18:05+5:30
वादळी वाऱ्याने लहान झाडे पूर्णपणे कोसळत आहेत. या झाडांना काठ्यांनी बांधून आधार दिला जात आहे. शिवाय, ट्री गार्डचे संरक्षण ...
वादळी वाऱ्याने लहान झाडे पूर्णपणे कोसळत आहेत. या झाडांना काठ्यांनी बांधून आधार दिला जात आहे. शिवाय, ट्री गार्डचे संरक्षण दिले जात आहे. झाडांना वाचविणे अतिशय गरजेचे आहे. या अनुषंगाने सर्वांनी आपल्या परिसरातील झाडांना संरक्षण द्यावे असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा यांनी केले आहे. वादळी वाऱ्याने काही झाड पूर्णपणे कोसळत आहेत, तर काही झाड जमीनदोस्त होत आहेत. आपल्या परिसरात असे झाल्यास झाडांना संरक्षण द्यावे. जी झाडे उपसून बाजूला निघत आहेत ती झाड परत लावता येतात. सर्वांनी मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडांना वाचवावे असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानने केले आहे.
पावसाळ्यात एक व्यक्ती:एक झाड उपक्रम राबवावा...
कोरोना काळात सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व पटले आहे. ज्या झाडांकडून आपण सर्वजण मोफत ऑक्सिजन घेतो त्या झाडांना वाचविणे ही आपल्या सर्वांची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी येत्या पावसाळ्यात एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानने केले आहे.