निवासी डॉक्टरांचे अधिष्ठाता कार्यालयासमोर आंदोलन
By हरी मोकाशे | Published: February 24, 2024 05:14 PM2024-02-24T17:14:29+5:302024-02-24T17:15:05+5:30
धिष्ठाता कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन केले. तसेच मागण्यांच्या घोषणाही दिल्या.
लातूर : विद्यावेतनात वाढ करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप सुरू केला आहे. शनिवारी सकाळी अधिष्ठाता कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन केले. तसेच मागण्यांच्या घोषणाही दिल्या.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत खात्यात जमा करण्यात यावे, निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात वसतिगृहांची व्यवस्था करण्यात यावी, विद्यावेतन हे केंद्रीय संस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे अशा मागण्यांसाठी ‘मार्ड’ने गुरुवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. आंदोलनात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील १८० निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत. शनिवारी अधिष्ठाता कार्यालयासमाेर ठिय्या मांडत घोषणा दिल्या.
या आंदोलनात मार्डचे अध्यक्ष डॉ. महेश हामंद, उपाध्यक्ष डॉ. अखिल देव, सहउपाध्यक्ष ऋभष सिंह, सचिव डॉ. नारायण काबरा, डॉ. सुशांत देशमुख, डॉ. प्रतिभा होनशेट्टे, संयुक्त सचिव डॉ. शुभम कांबळे, माजी अध्यक्ष डॉ. अनिल चव्हाण, माजी उपाध्यक्ष डॉ. स्वप्नील कदम आदी सहभागी झाले आहेत.