लातूरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात निषेध आंदोलन
By आशपाक पठाण | Published: February 8, 2024 03:38 PM2024-02-08T15:38:57+5:302024-02-08T15:39:16+5:30
निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा केल्याचा आंदोलकांचा आरोप
लातूर : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या विरोधात अतिशय पक्षपाती निकाल दिला. २५ वर्षे ज्या पक्षाला उभे केले, ज्या पक्षाचे संगोपन केले त्या पक्षाचे नाव व चिन्ह हिरावून घेण्यात आल्याचा आरोप करीत लातूरात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजा मनियार यांच्या नेतृत्वात गुरुवारी निषेध आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करुन निवडणूक आयोगाच्या निकालाचा निषेध केला. यावेळी ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख, लातूर तालुका कार्याध्यक्ष बक्तावर बागवान, ग्रामीण विधानसभा अध्यक्ष मदन आबा काळे, ॲड.विनायक शिंदे, युवक तालुकाध्यक्ष श्रीकांत मगर, सुनिल बिडवे, लातूर शहर विधानसभा अध्यक्ष ॲड. शेखर हवीले, ॲड. निशांत वाघमारे, ॲड. इरफान शेख, कत्ते, इरफान शेख, युवक शहर जिल्हाध्यक्ष समीर शेख, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष ॲड. आर. झेड. हाश्मी, अजहर शेख, महिला आघाडी शहर जिल्हाध्यक्ष मनिषाताई कोकने, युवती जिल्हाध्यक्ष स्नेहाताई मोटे, लीगल सेलचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. राजकुमार गंडले, ॲड. हसन शेख, अश्रेश्वर शितोळे, मोईन पटेल, तुषार मुचवाड, रोहित चौहान, रघुनाथ मदने, गांगापुरे, बसवेश्वर रेकुळगे, फिरोज खान, राहुल ढाले, प्रवीण साळुंके, अब्दुल शेख, इब्राहिम शेख, बरकत शेख, तौसिफ शेख, जमील नाना, शकील शेख, जाकीर तांबोळी, सिराज सय्यद, खंडू लोंढे, अबा सूर्यवंशी, शाहरुख पठाण, आनंद विरेकर, आदर्श उपाध्याय, सलीम घंटे, इरान्ना पावले, रघुनाथ कुचेकर, राजपाल भंडे, मतीन शेख, शमू सय्यद, शहादत पठाण, निखिल मोरे, प्रतीक जाधव, जितेंद्र तोडकर आदींची उपस्थिती होती.