'आधी पूल बनवा नंतर पाणी सोडा'; घनसरगाव बॅरेजेससमोर ग्रामस्थांचे आंदोलन

By संदीप शिंदे | Published: May 16, 2023 03:48 PM2023-05-16T15:48:20+5:302023-05-16T15:49:15+5:30

पुलाचे काम सुरु असल्याने रेणा प्रकल्पातून दहा दिवसानंतर पाणी सोडणार

Protest of villagers in front of Ghansargaon barrage demanding release of water for farming | 'आधी पूल बनवा नंतर पाणी सोडा'; घनसरगाव बॅरेजेससमोर ग्रामस्थांचे आंदोलन

'आधी पूल बनवा नंतर पाणी सोडा'; घनसरगाव बॅरेजेससमोर ग्रामस्थांचे आंदोलन

googlenewsNext

रेणापूर : रेणा मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात व घनसरगाव, रेणापुर, खरोळा बॅरेजेसमध्ये उन्हाळी हंगामासाठी मंगळवारपासून पाणी सोडण्यात येणार होते. मात्र, घनसरगावकडे जाणाऱ्या नदीतील पुलाचे काम सध्या सुरू आहे. पाणी सोडल्यास या पुलाचे काम थांबेल. परिणामी, पुल तयार करण्यास विलंब होईल म्हणून माजी सरपंच शरद दरेकर यांच्या नेतृत्वाखाली घनसरगाव बॅरेजेसमाेर मंगळवार आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत दहा दिवसानंतर पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

रेणा नदी काठच्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सिंचनासाठी मध्यम प्रकल्पातून मंगळवारी पात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. मात्र, दुसरीकडे रेणा नदीवर घनसरगावजवळ सुरू असलेले पुलाचे बांधकाम बंद करावे लागणार होते. किमान दहा दिवस तरी पाणी सोडु नये, अशी ग्रामस्थांची मागणी होती. मात्र, प्रशासनाने रेणा मध्यम प्रकल्पातुन नदी पात्रात मंगळवारी सकाळी आठ वाजता पाणी सोडण्याचे निश्चित केले होते. याबाबत शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सुचनाही पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, उपविभागीय अधिकारी एस.एम.निटुरे, शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केल्या होत्या. दरम्यान, घनसरगाव येथील ग्रामस्थांनी पुलाचे काम दहा दिवसांत पुर्ण होईल, तोपर्यंत पाणी सोडू नये, या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार रविवारी इंजिनियर मुकदम, डेप्युटी इंजिनिअर मुळे व शाखा अभियंता थडकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. मात्र, तरीही मंगळवारी पाणी सोडण्याची तयारी प्रशासनाकडून सुरु असल्याने ग्रामस्थांनी मंगळवार सकाळपासून बॅरेजेसमोर आंदोलन सुरु केले. त्यामुळे उघडलेले दरवाजे बंद करुन आंदोलनस्थळी पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, खरोळा येथील ग्रामस्थ व पुलाचे काम करणाऱ्या संबंधित विभागाचे कर्मचारी यांनी संवाद साधत २६ मे रोजी प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. तसेच दहा दिवसात पूल बांधकाम करणाऱ्या गुत्तेदारांनी फाउंडेशनचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, रेणाचे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, खरोळ्याचे सरपंच धनंजय देशमुख, बाळासाहेब देशमुख, एस.आर. थडकर, एस.एम. निटुरे, शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी, अभियंता शोएबअली खान, असलम शेख, माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात यांचा होता सहभाग...
घनसरगाव बॅरेजसमोर करण्यात आलेल्या आंदोलनात माजी सरपंच शरद दरेकर, प्रताप देशमुख, हेमंत दरेकर, ॲड. महादू कांबळे, अशोक शिंदे, चंद्रकांत पवार, वैजनाथ मदने, विलास आमनावर, कल्याण सूर्यवंशी, देविदास वीरकर, वाजीद पठाण, साहेबराव शिंदे, दत्ता धनवे, दत्ता शिंदे, विश्वनाथ गाडे, शेपू शेख, काला कांबळे, गोविंद शहापुरे, साधु खटके, तानाजी खटके, मौला शेख, सतीश दरेकर, अशोक शिंदे, राहुल कांबळे, तुकाराम कांबळे, माणिक दरेकर, माणिक आमनावर, युवराज कांबळे, मनोहर आमनावर, इब्राहिम शेख, शंकर शाहू आदींसह घनसरगाव व खरोळा येथील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Protest of villagers in front of Ghansargaon barrage demanding release of water for farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.