अभिमानास्पद! चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा समावेश

By संदीप शिंदे | Published: August 25, 2023 06:37 PM2023-08-25T18:37:03+5:302023-08-25T18:37:47+5:30

या अभिमानास्पद कामगिरीमध्ये अहमदपूर तालुक्यातील लेंडेगाव येथील दीपक गौतम लेंडेगावकर या युवा शास्त्रज्ञाचा समावेश आहे.

Proud! Lendegaon scientist included in Chandrayaan 3 mission | अभिमानास्पद! चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा समावेश

अभिमानास्पद! चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा समावेश

googlenewsNext

किनगाव : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चांद्रयान ३ माेहिमेला यश मिळाले असून, विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण गोलार्धात यशस्वीपणे उतरले. या अभिमानास्पद कामगिरीमध्ये अहमदपूर तालुक्यातील लेंडेगाव येथील दीपक गौतम लेंडेगावकर या युवा शास्त्रज्ञाचा समावेश आहे.

लेंडेगाव येथील दिपक यांचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण महात्मा फुले विद्यालय अहमदपूर तर सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथून झाले. अमेरिकेतील दक्षिणा फाउंडेशनने नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन १२० जणांची आयआयटी कोचिंगसाठी निवड केली होती. यात दीपक यांचा समावेश होता. त्यांनी केरळमधील तिरुवंतपुरम येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ स्पेस टेक्नोलॉजीमधून चार वर्षाचे प्रशिक्षण घेऊन इस्त्रोमध्ये २०१३ पासून सेवेस सुरुवात केली. दीपक यांच्या वडीलांनी तलाठी कार्यालयात कामे केले आहे. माझा मुलगा चंद्रयान ३ मोहिमेमध्ये सहभागी झाला. त्याच्या हातून देशसेवा घडत असल्याचा अभिमान आहे, असे दिपक यांचे वडील गौतम लेंडेगावकर यांनी सांगितले.

Web Title: Proud! Lendegaon scientist included in Chandrayaan 3 mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.