गाव विकासात लोकसहभाग महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:21 AM2021-02-24T04:21:43+5:302021-02-24T04:21:43+5:30
कृषी विभागाच्या वतीने लातूर तालुक्यातील रायवाडी येथे नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत सुक्ष्म नियोजन प्रशिक्षण पार पडले. त्यावेळी ...
कृषी विभागाच्या वतीने लातूर तालुक्यातील रायवाडी येथे नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत सुक्ष्म नियोजन प्रशिक्षण पार पडले. त्यावेळी ते बोलत हाेते. यावेळी उपसरपंच बालाजी उरगुंडे, पोकराचे प्रकल्प सहाय्यक शिरीष खंदाडे, कृषी पर्यवेक्षक प्रदीप रेड्डी, चेअरमन बालासाहेब पाटील, कृषी सहायक सूर्यकांत लोखंडे, ग्रामसेवक शिवकुमार नरवणे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला उरगुंडे, श्रीहरी बेसके, बालासाहेब काळे, दगडू जाधव, रवि शिंदे, नागनाथ बेसके उपस्थित होते.
सूत्रसंचालन पांडुरंग काळे यांनी केले. आभार कृषि पर्यवेक्षक रेड्डी मानले.
याप्रसंगी साईलिला व नानाजी देशमुख शेतकरी गटांनी तयार केलेल्या औजार बँकेची पाहणी अधिका-यांनी केली. यशस्वीतेसाठी समूह सहाय्यक गोविंद कराड, शेतीशाळा प्रशिक्षण मनीषा कांबळे, मनीषा उरगुंडे, सतीश जाधव, कृष्णात बरदापुरे, अमोल गायकवाड, गोपाळ शिंदे, सूर्यकांत बामणे, रविंद्र मोहिते, मधुकर उरगुंडे, सतीश मोहिते, दयानंद पाटील, दगडू जाधव, प्रेम उरगुंडे पाटील, व्यंकट गिरी यांनी परिश्रम घेतले.