भाजीपाल्यांसोबत डाळही सामान्यांच्या आवाक्याबाहेर; मसूर डाळीने भूक भागविली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:29+5:302021-07-23T04:13:29+5:30
गॅस दरवाढीने गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे. आता त्यातच किराणा आणि भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने गृहिणींना किचनचा मेळ ...
गॅस दरवाढीने गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे. आता त्यातच किराणा आणि भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने गृहिणींना किचनचा मेळ घालताना कसरत करावी लागत आहे. मागच्या दोन महिन्यांमध्ये खाद्यतेलाचे दर वाढले होते. आता त्यात थोडी घसरण झाली असली तरी किराणा, तसेच भाजीपाला आणि गॅस दरवाढीने उच्चांक गाठला आहे.
म्हणून डाळ महागली
साठवणूक क्षमतेवर मर्यादा घातल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी थांबविलेली आहे. जेवढ्या साठवणुकीला परवानगी आहे, तेवढीच खरेदी होत असल्याने डाळी महागल्या आहेत.
खरेदी कमी आणि मागणी जास्त त्यामुळे डाळीचे भाव वाढलेले आहेत. व्यापाऱ्यांच्या साठवणुकीच्या गोडावूनवर छापे मारले गेले. त्यामुळे खरेदी नाही.
केंद्र शासनाने साठवणूक मर्यादा वाढवून दिल्यानंतर वाढलेले डाळीचे भाव कमी होतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सर्वसामान्यांचे हाल
डाळी, भाजीपाल्यांचा भाव वाढला आहे. त्यामुळे किचन सांभाळताना अडचणीचा सामना करावा लागतो. गॅसही महागला आहे. खाद्यतेल दोनशे रुपयांपर्यंत गेले होते. आता डाळी महागल्या आहेत. - हिना पठाण, गृहिणी
गॅस, किराणा, भाजीपाला, तेल महागल्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे. आज भाजी काय करावी, याचा विचार करावा लागत आहे. जी डाळ आवाक्यात आहे, त्या डाळीवर भागवावे लागत आहे. - माधुरी शिंदे, गृहिणी
म्हणून भाजीपाला कडाडला
मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने भाजीपाला महागला आहे. शिवाय, सध्या पावसाळा आहे. पावसाळ्यात रोगराई पसरून भाजीपाला खराब होतो. त्यामुळे सध्या आवक कमी आहे. परिणामी, भाज्यांचे भाव वाढलेले आहेत.