ग्राहकांकडून वसूल केलेले सव्वा लाख रुपये दुचाकी अडवून पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:24 AM2021-09-04T04:24:28+5:302021-09-04T04:24:28+5:30

फिर्यादी ख्वाजा मैनोदीन जिंदा मुजावर (जना स्मॉल फायनान्स बँक, रा. कासारसिरसी ता. निलंगा) यांनी फायनान्स बँकेचे ग्राहकांकडून वसूल केलेले ...

A quarter of a lakh rupees recovered from a customer was stolen | ग्राहकांकडून वसूल केलेले सव्वा लाख रुपये दुचाकी अडवून पळविले

ग्राहकांकडून वसूल केलेले सव्वा लाख रुपये दुचाकी अडवून पळविले

Next

फिर्यादी ख्वाजा मैनोदीन जिंदा मुजावर (जना स्मॉल फायनान्स बँक, रा. कासारसिरसी ता. निलंगा) यांनी फायनान्स बँकेचे ग्राहकांकडून वसूल केलेले पैसे घेऊन हालकी ते बोरी मार्गे लातूरकडे दुचाकीवर येत असताना वाटेत तळेगाव पाटी नजिक त्यांच्या दुचाकीच्या सायलेन्सरला पायाने धक्का दिला. त्यामुळे ते खाली पडले असता त्यांच्या बॅगेतील रोख १ लाख २६ हजार ५३० तसेच दहा हजार रुपये किमतीचा टॅब व एक मशीन असा एकूण १ लाख ३८ हजार ५३० रुपयांचा ऐवज तसेच कागदपत्रे अज्ञात तिघांनी लंपास केले. शिवाय फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिघे पसार झाले. याबाबत ख्वाजा मोईनुद्दीन जिंदा मुजावर यांनी शिरुर अनंतपाळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांविरुद्ध कलम ३९४, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुडके करीत आहेत.

लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चोरटे पसार...

दुचाकीच्या सायलेन्सरला धक्का मारुन दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर फिर्यादीच्या बॅग मधील १ लाख ३८ हजार ५३० रुपयांचा नगदी ऐवज जबरीने काढून घेतला. आणि चोरटे तेथून पसार झाले, असे शिरुळ आनंतपाळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: A quarter of a lakh rupees recovered from a customer was stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.