रेणापूर तालुक्यात रब्बीचा १४९ टक्के पेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:17 AM2020-12-08T04:17:18+5:302020-12-08T04:17:18+5:30
... रस्त्यावरच वाहने, वाहतुकीची कोंडी चाकूर : विविध खरेदीनिमित्ताने नागरिक वाहनाद्वारे येत आहेत. मात्र, हे वाहनधारक रस्त्यानजीक वाहने उभी ...
...
रस्त्यावरच वाहने, वाहतुकीची कोंडी
चाकूर : विविध खरेदीनिमित्ताने नागरिक वाहनाद्वारे येत आहेत. मात्र, हे वाहनधारक रस्त्यानजीक वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे इतर वाहनधारकांसह पादचाऱ्यांना ये- जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. काही वेळेस शहरातील मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. अशावेळी पायी ये- जा करणाऱ्यांना रस्ता शोधावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
...
भाजीपाल्याचे दर घसरल्याने चिंता
देवणी : तालुक्यातून नदीचे पात्र वाहत असल्याने काही शेतकरी नगदी पीक भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. सध्या बाजारपेठेत कोथिंबीर, मेथी, सिमला मिरची, लिंबूचे दर घसरले आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांच्या पदरी लागवडीचा खर्चही पडत नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अति पावसामुळे खरिपाचे नुकसान झाले. आता नवे संकट शेतकऱ्यांवर आले आहे.
...
६४ जणांचे मुरुड येथे रक्तदान
मुरुड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मुरुड येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. उद्घाटन आ. विक्रम काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी जि.प. सदस्य दिलीप दादा नाडे, सरपंच अभय नाडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख बी.एन. डोंगरे, भाजपाचे हनुमंत नागटिळक, प्रा. अंकुश नाडे, पंकज काटे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी भालचंद्र धावारे, महेश सुरवसे, समाधान शितोळे, राहुल लांडगे आदींनी परिश्रम घेतले.
...
महादेव मंदिरास ५१ हजारांची देणगी
अहमदपूर : शिरुर ताजबंद येथील छत्रपती शाहू महाराज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बळीराम मोरे यांनी ५१ हजार ५१ रुपयांचा धनादेश ग्रामदैवत श्रीक्षेत्र महादेव मंदिर देवस्थानच्या बांधकामासाठी मंदिर व्यवस्थापक शिवप्पा स्वामी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी प्रतिष्ठानचे माधव सरवदे, चेअरमन राजकुमार सोमवंशी, मल्लिकार्जून स्वामी, वामनराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य राहुल वाघमारे आदी उपस्थित होते.
...