कोराळवाडी परिसरात हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: February 25, 2023 06:27 PM2023-02-25T18:27:12+5:302023-02-25T18:27:24+5:30
या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लातूर : निलंगा तालुक्यातील काेराळवाडी परिसरात असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर कासार शिरसी ठाण्याच्या पाेलिसांनी छापा मारला असून, ३ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत आठ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यात हातभट्टी दारुनिर्मिती आणि विक्री करणाऱ्याविराेधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. त्यानुसार कासार शिरसी पोलिस ठाण्याच्या पथकाने निलंगा तालुक्यातील कोराळवाडी परिसरात असलेल्या हातभट्टीच्या अड्ड्यावर शनिवारी छापा मारला. दरम्यान, पथकाने हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे ४ हजार ७०० लिटर रसायन, हातभट्टी निर्मिती करण्याचे साहित्य आणि हातभट्टी दारु असा एकूण ३ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पाेलिस पथकाने रसायन, हातभट्टी आणि हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे साहित्य नष्ट केले. याबाबत कासार शिरसी पाेलिस ठाण्यात शिवशंकर सुभाष बुकले, राम अण्णाराव दगदाडे, अंकूश लहू कानडे, मधुकर लिंबाजी मिलगिरे, दिलीप दत्तू उमापुरे, बाळू व्यंकट उमापुरे, लक्ष्मण तिमन्ना उमापुरे आणि वसंत ईरन्ना उमापुरे (सर्व रा. काेराळवाडी ता. निलंगा) यांच्याविराेधात कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक रियाज शेख, पोलिस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर, अमलदार मारुती महानवर, गोरोबा घोरपडे, ज्ञानोबा शिरसाट, श्रीकांत वरवटे, गणेश सोनटक्के, विकास मुगळे, बळीराम मस्के यांच्या पथकाने केली.