हाडाेळतीत कुंटणखान्यावर छापा; तीन महिलांसह एक पुरुष ताब्यात
By राजकुमार जोंधळे | Published: September 2, 2022 07:32 PM2022-09-02T19:32:48+5:302022-09-02T19:33:36+5:30
अहमदपूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहमदपूर (जि. लातूर) : तालुक्यातील हाडोळती येथे बाभळदरा रोडवर असलेल्या एका घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर अहमदपूर येथील पाेलीस पथकाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारा छापा मारला. यावेळी तीन महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, हडाेळती येथील बाभळदरा राेडवर एका दाेन मजली घरात कुंटणखाना सुरु असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांना मिळाली. या माहितीची पडताळणी करुन, एका डमी ग्राहकाला पाठविण्याचे ठरले. पाेलीस कर्मचारी पुंडलिक केंद्रे, प्रशिक्षणार्थी महिला पाेलीस उपनिरीक्षक चट, कोठेवाढ, पोलीस नाईक केंद्रे, आरदवाड यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा लावला. त्यापूर्वी हडोळती येथील पोलीस चौकीतील पाेलीस कर्मचारी केंद्रे, धुळगुंडे यांना घटनेची माहिती दिली. डमी ग्राहक पाठविण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक कामठेवाड यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने छापा मारला. याततीन महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून राेख २ हजार १०० रुपये जप्त करण्यात आले. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात अनैतिक देह व्यापार अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
डमी ग्राहक अन् ५०० रुपयांची नाेट...
अहमदपूर येथील पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांना बखऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हडाेळती येथील कुंटणखान्यावर डमी ग्राहक पाठविण्यात आला. कुंटणखान्यावर डमी ग्राहकाना एका महिलेशी संवाद साधून ठरल्याप्रमाणे ५०० रुपयांची नाेट समाेर केली. यावेळी अचानक पाेलिसांनी छापा मारल्यानंतर एकच गाेंधळ उडाला. डमी ग्राहक आणि ५०० रुपयांच्या नाेटेने कुंटणखान्यातील प्रकार समाेर आणला आहे.