हातभट्टी अड्ड्यांवर धाडी; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त, १७ जणांना अटक
By राजकुमार जोंधळे | Published: May 3, 2024 10:48 PM2024-05-03T22:48:26+5:302024-05-03T22:49:05+5:30
यावेळी १७ आराेपींना अटक केली असून, तब्बल ३ लाख ७ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत १९ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लातूर : जिल्ह्यात विविध तांड्यावर सुरु असलेल्या हातभट्टी दारु अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, लातूर आणि उदगीर, स्थानिक पाेलिस आणि एफएसटीच्या पथकांनी एकाचवेळी शुकवारी धाडी टाकल्या आहेत. यावेळी १७ आराेपींना अटक केली असून, तब्बल ३ लाख ७ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत १९ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे उपायुक्त बी.एच. तडवी यांच्या निर्देशानुसार लातूरचे अधीक्षक केशव राउत यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील उदगीर, लातूर परिसरातील हातट्टी अड्ड्यावर धाडी टाकण्यात आल्या. डाेंगरशेळकी तांडा (ता. उदगीर), वसंतनगर तांडा (ता. लातूर) येथे उत्पादन शुल्क विभाग, वाढवणा, उदगीर ग्रामीण पाेलिस, एफएसटी पथकांनी संयुक्तपणे कारवाई केली. या धाडसत्रात १७ आराेपींना अटक केली असून, हातभट्टी दारु - ४६७ लिटर, रसायन - ५ हजार ४५ लिटर, देशी दारु - ८० लिटर, विदेशी दारु - १७ लिटर असा एकूण ३ लाख ७ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विविध पथकांची संयुक्त कारवाई... -
ही कारवाई राज्य उत्पादन विभाग उदगीरचे निरीक्षक आर.एम. चाटे, दुय्यम निरीक्षक ए.के. शिंदे, ए.एस. घुगे, एन.डी. कचरे, ज.के. मुंगडे, एम. जी. पाटील, आर.जी. सलगर, सहायक निरीक्षक गणेश गाेले, सुरेश काळे, जे.आर. पवार, श्रीकांत साळुंके, पाेउपनि. गायकवाड, दुय्यम निरीक्षक गायकवाड, आर.आर. नागरगाेजे, आर.डी. सपकाळ, पाेकाॅ. केंद्रे, कलकले, उजेडे, फुलारी, शिंदे, फुलारी, एफएसटी पथकाचे मारमवार, व्ही.आर. दंडे यांच्या पथकांनी केली.