उदगीर शहरात जुगार अड्ड्यावर छापा; दीड लाखांच्या मुद्देमालासह १४ आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:20 AM2021-09-03T04:20:55+5:302021-09-03T04:20:55+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या लातूर पथकाला उदगीर शहरात जुगार चालत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या लातूर पथकाला उदगीर शहरात जुगार चालत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी छापा मारला असता, अडत लाइन परिसरात एका इमारतीमधील बंद रूममध्ये तिरट नावाचा जुगार चालवीत असल्याचे १४ जण आढळून आले. सदर इमारत बलभीम नाईक यांच्या मालकीची असून, या इमारतीच्या एका रूममध्ये अविनाश गायकवाड हा जुगार क्लब चालवित असल्याचे आढळून आले. यावेळी अन्य तेरा जण बेकायदेशीररीत्या स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत होते. त्या सर्वांची पथकाने झडती घेऊन त्यांच्याकडे जुगार साहित्यासह एक लाख ४८ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. पोलीस पथकाने तो जप्त केला असून, एकूण १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत उदगीर शहर पोलीस ठाण्यात या चौदा जणांच्या विरोधात कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उदगीर शहर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, पोलीस अंमलदार नामदेव पाटील, खुर्रम काझी, बालाजी जाधव, यशपाल कांबळे, रवि कानगुले, जमीर शेख, जमीर शेख, सपोउपनि. खान यांचा सहभाग होता.