१८८ दारु अड्ड्यांवर छापेमारी, १८१ जणांविरोधात गुन्हा दाखल; ‘उत्पादन शुल्क’चा दणका, साडेबारा लाखांचा मुद्देमालही जप्त
By राजकुमार जोंधळे | Updated: March 19, 2025 09:07 IST2025-03-19T09:06:35+5:302025-03-19T09:07:27+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेडचे विभागीय उपायुक्त बी.एच. तडवी यांच्या निर्देशानुसार आणि लातूर येथील अधीक्षक केशव राऊत यांच्या आदेशानुसार अवैध हातभट्टी, देशी-विदेशी दारुविक्री, चाेरट्या मार्गाने हाेणाऱ्या वाहतुकीविराेधात १४ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान धडक माेहीम उघडली हाेती...

प्रतिकात्मक फोटो
लातूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या हातभट्टी, अवैध देशी दारु विक्री करणाऱ्या १८८ अड्ड्यांवर छाेपेमारी केली आहे. यामध्ये १८१ जणांना अटक केली असून, तब्बल १२ लाख ३८ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेडचे विभागीय उपायुक्त बी.एच. तडवी यांच्या निर्देशानुसार आणि लातूर येथील अधीक्षक केशव राऊत यांच्या आदेशानुसार अवैध हातभट्टी, देशी-विदेशी दारुविक्री, चाेरट्या मार्गाने हाेणाऱ्या वाहतुकीविराेधात १४ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान धडक माेहीम उघडली हाेती. महिनाभरात लातूर, उदगीर, निलंगा, चाकूर विभागाच्या संयुक्त पथकांनी १८८ ठिकाणी छापा मारला. यामध्ये १८१ जणांना अटक केली. दारुची वाहतूक करताना पाच वाहने पकडली. यावेळी १ हजार ७३२ लिटर हातभट्टी दारु, हातभट्टी निर्मिती करण्यासाठी लागणारे २ हजार ३५० लिटर रसायन, ७४५ लिटर देशी दारु, ४२० लिटर ताडी, ११९ लिटर विदेशी दारु, १३ लिटर बिअर असा १२ लाख ३८ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई निरीक्षक आर.एम. काेतवाल, आर.एम. चाटे, आर.व्ही. कडवे, यू.व्ही. मिसाळ, दुय्यम निरीक्षक आर.डी. भाेसले, एन.टी. राेटे, एस.आर. राठाेड, एस.के.वाघमारे, बी.आर. वाघमाेडे, व्ही.पी. राठाेड, बी.एल. येळे, एस.डी. घुले, एस.पी. काळे, डी.डी. साळवी, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, निलंश गुणाले, मंगेश खारकर, षडाक्षरी केंगारे, गजनन हाेळकर, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, साैरभ पाटवदकर, साेनाली गुडले, ज्याेतीराम पवार, श्रीकांत साळुंके, संताेष केंद्रे, कपील गाेसावी, शेन्नेवाड, प्रथमेश फत्तेपुरे, विशाल सुडके, गिरी, भरत गायकवाड, बळी साखरे, ऋषी चिंचाेलीकर, शैलेश गड्डीमे, हणमंत माने, हसुळे, वडवळे यांच्या पथकाने केली आहे.