३४ अड्ड्यांवर धाडी; दारु, वाहने पकडली! आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Updated: April 10, 2025 00:29 IST2025-04-10T00:28:38+5:302025-04-10T00:29:52+5:30
राज्य उत्पादन शुल्कची कारवाई...

३४ अड्ड्यांवर धाडी; दारु, वाहने पकडली! आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
राजकुमार जाेंधळे, लातूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या ३४ अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाडी टाकल्या. यात चाेरट्या मार्गाने दारुची वाहतूक करणाऱ्या, गुन्ह्यांत वापर असलेली १९ वाहने पथकांनी जप्त केली. ३० गुन्ह्यांची नाेंद केली असून, ५७ जणांना अटक केली. यावेळी ७ लाख ८८ हजार ३६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उप-अधीक्षक बी.एच. तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूरचे अधीक्षक केशव राऊत यांच्या आदेशानुसार विशेष गुन्हा अन्वेषणाच्या माेहिमेच्या अनुषंगाने ३० मार्च ते ९ एप्रिल २०२५ अखेर लातूर जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि चाेरट्या मार्गाने हाेणाऱ्या वाहतुकीविराेधात लातूर, उदगीर, निलंगा, चाकूर विभागाने संयुक्तपणे माेहीम राबवत ३४ अड्ड्यांवर धाडी टाकल्या. यामध्ये ३० गुन्ह्यांची नाेंद केली असून, ५७ जणांना अटक केली आहे. चार वाहने दारुची वाहतूक करताना पकडले. हातभट्टी दारु ९६ लिटर, देशी दारु ३५१ लिटर, विदेशी १८ लिटर असा एकूण ७ लाख ८८ हजार ३६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर.एम. काेतवाल, आर.एम. चाटे, आर.व्ही. कडवे, यू.व्ही. मिसाळ, दुय्यम निरीक्षक आर.डी. भाेसले, एन.टी. राेटे, एस.आर. राठाेड, एस.के. वाघमारे, बी.आर. वाघमाेडे, एन.डी. कचरे, व्ही.पी. राठाेड, बी.एल. येळे, एस.डी. घुले, एस.पी. काळे, डी.डी. साळवे, बी.एच. आशमाेड, एस.पी. मळगे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, निलेश गुणाले, मंगेश खारकर, षडाक्षरी केंगारे, गजानन हाेळकर, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, साैरभ पाटवदकर, साेनाली गुडले, ज्याेतीराम पवार, श्रीकांत साळुंके, संताेष केंद्रे, कपील गाेसावी, शेन्नेवाड, प्रथमेश फत्तेपुरे, विशाल सुडके, गिरी, भरत गायकवाड, बळी साखरे, ऋषी चिंचाेलकर, शैलेश गड्डीमे, हणमंत माने, हसुळे, वडवळे यांच्या पथकांनी केली आहे.