सोयाबीनला फुले लागण्याच्या काळात पावसाची हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:24 AM2021-08-12T04:24:25+5:302021-08-12T04:24:25+5:30
हरंगुळ बु. व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी उसनवारी करून, पेरणीसाठी बी-बियाणे, खते खरेदी केली होती. पावसाळ्याच्या सुरुवातीस चांगला पाऊस झाल्याने, ...
हरंगुळ बु. व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी उसनवारी करून, पेरणीसाठी बी-बियाणे, खते खरेदी केली होती. पावसाळ्याच्या सुरुवातीस चांगला पाऊस झाल्याने, वेळेवर पेरणी होत असल्याने शेतकरी आनंदी झाले होते. पेरणीनंतर पिकांपुरता पाऊस झाल्यामुळे पीकही बहरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिल्याने पीक कोमेजून जात आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
यंदा सर्वाधिक भाव...
गेल्या वर्षी सोयाबीनची रास झाल्यानंतर, बहुतांश शेतकऱ्यांनी ४ ते ५ हजार रुपये क्विंटल दराने विक्री केली. त्यानंतर, सोयाबीनचे भाव वाढत राहिले. यंदा पहिल्यांदाच विक्रमी भाव मिळाला असून, १० हजारांपेक्षा अधिक दर मिळाला आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे सोयाबीन नाही. यंदाच्या हंगामातही चांगला भाव मिळेल, अशी आशा असताना पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली आहे.