फकिरा ब्रिगेडतर्फे ‘रास्ता रोको’; शाळा दत्तक योजना रद्द करण्याची मागणी
By संदीप शिंदे | Published: October 20, 2023 07:34 PM2023-10-20T19:34:09+5:302023-10-20T19:34:30+5:30
क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी,
रेणापूर : येथील लातूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर फकिरा ब्रिगेडच्या वतीने विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच, मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. रास्ता रोको आंदोलनामुळे या महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
शाळा दत्तक योजना व कंत्राटी नोकरभरतीचा शासन आदेश रद्द करावा, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज विनाअट मंजूर करा, रमाई आवास घरकुल योजना व इतर घरकुल योजना मंजूर करताना शहरी व ग्रामीण असा भेदभाव न करता सारखाच निधी द्यावा, लातूर जिल्ह्यातील परित्यक्ता, अपंग, विधवा महिलांचा सर्व्हे करून त्यांना घरकुल मंजूर करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनात प्रदेशाध्यक्ष श्रीरंग सरवदे, राज्य कार्याध्यक्ष प्रा. राजेंद्र लोदगेकर, महिला जिल्हाध्यक्ष ऊर्मिला नवगिरे, सचिव संजय विरोळे, जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, धाराशिव जिल्हाध्यक्ष नागिनी थोरात, सतीश शिंदे, संतोष पटनुरे, पांडुरंग मस्के, सुदर्शन शिंदे, बाळासाहेब वाघमारे, जयदीप आगलावे, बाळू पटनुरे, गोविंद धबडगे, मुकेश लोंढे, नाना लोंढे, अंगद कांबळे, लक्ष्मण खंडाळे, सुरेखा गायकवाड, सुभाष गायकवाड, विकास लोंढे, रमेश लोंढे, अंकुश कांबळे, गोविंद कुडके, सर्जेराव गायकवाड, अवधूत उपाडे यांच्यासह पदाधिकारी सहभागी होते.