निलंग्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 07:52 PM2018-07-19T19:52:38+5:302018-07-19T19:53:19+5:30
दुधास थेट अनुदान द्यावे, यासह अन्य विविध मागण्यांसाठी निलंगा तालुक्यातील कवठा पाटी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़
निलंगा (लातूर) : दुधास थेट अनुदान द्यावे, यासह अन्य विविध मागण्यांसाठी निलंगा तालुक्यातील कवठा पाटी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या़
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बबन चव्हाण, जिल्हा चिटणीस काका जाधव, बीक़े़ सावंत, ज्ञानोबा जांभळधरे, भरत पाटील, निवृत्ती सावंत, लक्ष्मण तावडे, दीपक चव्हाण, व्यंकट तावडे, अविनाश नाईक, विष्णू गजभार, विजयकुमार देशपांडे, यादव बोरोळे आदी उपस्थित होते. हमी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या तूर, हरभºयाची रक्कम तात्काळ देण्यात यावी़ पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकºयांना तात्काळ पिकविमा द्यावा, अशा मागण्याचे निवेदन निलंग्याचे पोलीस निरीक्षक राठोड यांना देण्यात आले़