शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी घोणसी येथील महिलांचे रास्तारोको आंदोलन

By संदीप शिंदे | Published: August 24, 2023 05:20 PM2023-08-24T17:20:07+5:302023-08-24T17:20:25+5:30

घोणसी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे.

Rastraroko movement of women in Ghonsi for supply of clean water | शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी घोणसी येथील महिलांचे रास्तारोको आंदोलन

शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी घोणसी येथील महिलांचे रास्तारोको आंदोलन

googlenewsNext

घाेणसी : जळकोट तालुक्यातील घोणसी येथील महिलांच्या वतीने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, या मागणीसाठी गुरुवारी बिदर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

घोणसी ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा होत नाही. सोबतच वेळेवर नळाला पाणी येत नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय किसान महिला मोर्चा, बचत गट सदस्या आणि गावातील महिलांच्या वतीने यापुर्वी बीडीओंना निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर कार्यवाही न झाल्याने महिलांनी गुरुवारी बिदर रस्त्यावर रास्ता राेको आंदाेलन केले. दरम्यान, बीडीओ यांनी आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे महिलांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला, दिपक इंगळे, नायब तहसीलदार संतोष गुट्टे, राजाभाऊ खरात, मंडळ अधिकारी राजेंद्र कांबळे, तलाठी अनिल उमाटे आदींसह सुजाता सबुचे, सचीव रेखाताई मालुसरे, भाग्यश्री आंब्रे, उमाताई श्रीमंगले, ममता लोहकरे, सारीका भोसले, चंद्रकला लांडगे, खुरशद मुल्ला, रुपाली वासरे, सुनीता डावळे, पार्वती पांचाळ, आश्विनी भोसले, कलावती काळे, हारुबाई मालुसरे, गंगाबाई आंब्रे, कालींदा परगे, अंजली नवाडे, अप्सरा मुल्ला, संगीता हुलुचे, कमलबाई सबुचे, सुनीता उदगिरे, संगिता म्हेत्रे, अंजुम मुल्ला आदींसह महिला उपस्थित होते.

गावातील नळाला दुर्गंधीयुक्त पाणी...
घोणसी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत यापुर्वीही निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर कार्यवाही न झाल्याने गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Web Title: Rastraroko movement of women in Ghonsi for supply of clean water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.