मराठा आरक्षणासाठी मुरुड-लातूर मार्गावर रास्तारोको आंदोलन

By संदीप शिंदे | Published: September 11, 2023 05:02 PM2023-09-11T17:02:10+5:302023-09-11T17:02:30+5:30

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी मान्य करावी, आंदोलनकर्त्यांवर केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे

Rastraroko movement on Murud-Latur route for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी मुरुड-लातूर मार्गावर रास्तारोको आंदोलन

मराठा आरक्षणासाठी मुरुड-लातूर मार्गावर रास्तारोको आंदोलन

googlenewsNext

बोरगाव काळे : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध नोंदविण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मुरुड-लातूर मार्गावर बोरगाव काळे येथे सोमवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव आपापले व्यवसाय बंद ठेवून सहभागी झाले होते.

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी मान्य करावी, आंदोलनकर्त्यांवर केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, लाठी हल्ल्यातील दोषींवर कारवाई करावी, सरसकट मराठा समाजास कुणबी म्हणून आरक्षण देण्यात यावे आदींसह विविध मागण्याचे निवेदन सपोनि बाळासाहेब नरवटे व मंडळ अधिकारी अनिल सूर्यवंशी यांना देण्यात आले. यावेळी नीळकंठ काळे, उमेश देशमुख, व्यंकट साखरे, उद्धव जाधव, दीपक काळे, बाबासाहेब काळे, चेअरमन सतीश काळे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दीपक इंगळे, आप्पा काळे, दादा पवार, गोविंद देशमुख, सतीश पिंपरे, सचिन भिसे, धर्मराज काळे, ज्ञानेश्वर काळे, भजनदास काळे, गोविंद काळे, बाळू देशमुख, पप्पू पाटील, दिलीप पिंपरे, अभिषेक देशमुख यांच्यासह मराठा व इतर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Rastraroko movement on Murud-Latur route for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.