आवक घटल्याने सोयाबीनला विक्रमी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:38+5:302021-07-23T04:13:38+5:30

हरभऱ्याची आवक २ हजार २०८ क्विंटल असून, कमाल दर ४ हजार ९२६, किमान ४ हजार तर सर्वसाधारण दर ४ ...

Record rates for soybeans due to declining income | आवक घटल्याने सोयाबीनला विक्रमी दर

आवक घटल्याने सोयाबीनला विक्रमी दर

Next

हरभऱ्याची आवक २ हजार २०८ क्विंटल असून, कमाल दर ४ हजार ९२६, किमान ४ हजार तर सर्वसाधारण दर ४ हजार ६०० क्विंटल प्रति मिळत आहे. तुरीची आवक घटलेली आहे. १ हजार ५१२ क्विंटल आवक असून, कमाल दर ६ हजार ३३६, किमान ५ हजार ७२५ आणि सर्वसाधारण दर ६ हजार २०० रुपये प्रति क्विंटल तुरीला मिळत आहे.

गहू, गूळ, ज्वारी, हायब्रीड, ज्वारी रबी, एरंडी, चिंचोका आदी शेतमालाचीही आवक किरकोळ प्रमाणात असून, दर मात्र बऱ्यापैकी आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक शेतमाल विक्रीमध्ये सोयाबीन असते. या सोयाबीनला हंगामात दर चांगला मिळत नाही. परंतु, आवक घटल्यानंतर आणि विक्रीचा हंगाम टळल्यानंतर दर वाढला आहे. व्यापारी, मोठे शेतकरी या दरवाढीचा फायदा घेत आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी मात्र यापूर्वीच सोयाबीन विकले आहे.

Web Title: Record rates for soybeans due to declining income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.