लातूर जिल्ह्यात १ हजार ११५ पदांची भरती; आता सुशिक्षितांना सहा महिने रोजगार!

By हरी मोकाशे | Published: August 2, 2024 06:48 PM2024-08-02T18:48:30+5:302024-08-02T18:48:59+5:30

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : जिल्हा परिषदेत सर्वाधिक ४४१ पदे

Recruitment of 1 thousand 115 posts in Latur District; Now educated for six months of employment! | लातूर जिल्ह्यात १ हजार ११५ पदांची भरती; आता सुशिक्षितांना सहा महिने रोजगार!

लातूर जिल्ह्यात १ हजार ११५ पदांची भरती; आता सुशिक्षितांना सहा महिने रोजगार!

लातूर : शिक्षणानंतर युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १ हजार ११५ पदांची भरती होणार आहे. त्यातून सुशिक्षित बेरोजगारांना सहा महिने रोजगार मिळणार आहे.

दरवर्षी मोठ्या प्रमाणात युवक शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसायाच्या शोधात फिरत आहेत. बहुतांश जणांना अनुभव नसल्याने व्यवसाय, नोकरी मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सुशिक्षित युवकांना नोकरीक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. आयटीआय, पदवी, पदविका व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांना सहा महिने रोजगार अर्थात विद्यावेतन देण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १ हजार ११५ पदांची भरती करण्यात येणार आहे.

असे मिळणार विद्यावेतन (रु.)...
बारावी - ६ हजार
आयटीआय - ८ हजार
पदवी - १० हजार रुपये

जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा...
विभाग - जागा

सामान्य प्रशासन - ५५
वित्त विभाग - ०१
पंचायत - ३१
आरोग्य - ४४
कृषी - ०१
बांधकाम - ११
पशुसंवर्धन - ०८
महिला व बालकल्याण - ०४
शिक्षण - २८१
जिल्हा बँक - ११०
एसटी महामंडळ - १००

प्रत्येक ग्रामपंचायतीस एक ऑपरेटर...
योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीस एक ऑपरेटरची नियुक्ती होणार आहे. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती असल्याने तेवढ्या सुशिक्षितांची निवड करण्यात येणार आहे.

इच्छुकांसाठी अशा आहेत अटी...
उमेदवाराचे वय १८ ते ३५ असावे. किमान शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण असावी. महाराष्ट्रातील रहिवासी, आधार कार्ड असावे. बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

ऑनलाईन करा अर्ज...
जिल्ह्यात एकूण ३१ अस्थापनांमध्ये १ हजार ११५ पदांची भरती केली जाणार आहे. त्यात जिल्हा परिषद, बँका, कारखाने अशा शासकीय, निमशासकीय, उद्योग आणि सेवा क्षेत्राचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. शिक्षणानुसार निवड करण्यात येणार आहे.

१८० जणांनी केली ऑनलाईन नोंदणी...
जिल्हा परिषदेअंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत १८० इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार निवड होणार आहे.

इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करावी...
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित युवकांना कामाचा अनुभव मिळणार आहे. त्याचबरोबर रोजगार क्षमता वाढणार आहे. जिल्ह्यातील सुशिक्षितांनी ऑनलाईन नोंदणी करावी. तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत.
- दत्तात्रय गिरी, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन.

अनुभवामुळे नोकरी, व्यवसाय मदत...
योजनेच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच अनुभव येईल. नोकरी, व्यवसायासाठी मदत होईल. युवकांनी नोंदणी करावी.
- बालाजी मरे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास.

 

Web Title: Recruitment of 1 thousand 115 posts in Latur District; Now educated for six months of employment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.