महाडीबीटी पोर्टलवर ४१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:00 AM2021-01-08T05:00:44+5:302021-01-08T05:00:44+5:30
महाडीबीटी पोर्टलवर शेतीविषयक अवजारे, ड्रीप, पाईप, शेडनेट, पाॅली हाऊस, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांसाठी एकच अर्ज उपलब्ध ...
महाडीबीटी पोर्टलवर शेतीविषयक अवजारे, ड्रीप, पाईप, शेडनेट, पाॅली हाऊस, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांसाठी एकच अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आतापर्यंत औसा तालुक्यातील ६ हजार ५०६, निलंगा ५ हजार ७८९, देवणी २ हजार ६५८, अहमदपूर ४ हजार ८४३, चाकूर ४ हजार २८७, जळकोट १ हजार ६२९, लातूर ७ हजार ६६६, रेणापूर ४ हजार ४५५, शिरूर अनंतपाळ १ हजार ४१८, तर उदगीर तालुक्यातील ३ हजार ४७२ अशा एकूण ४२ हजार ७२३ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, फुलपीक लागवड, फळ लागवड, प्लास्टिक मल्चिंग, शेतकरी अभ्यास दौरा, सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ, पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र आदी घटकांसाठी अर्ज करता येणार आहेत. यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, सात-बारा, ८ अ, आधारलिंक मोबाईल असणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
सीएससी सेंटरवर सुविधा उपलब्ध
ग्रामस्तरावर सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायत संग्राम केंद्र आदी ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात ४२ हजार ७२३ शेतकऱ्यांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे. योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता ११ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.