जिल्ह्यातील ७८७२ शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:18 AM2020-12-24T04:18:44+5:302020-12-24T04:18:44+5:30

अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली कृषी विभागाने विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या ...

Registration of 7872 farmers in the district on MahaDBT portal | जिल्ह्यातील ७८७२ शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी

जिल्ह्यातील ७८७२ शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी

Next

अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली कृषी विभागाने विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या योजना निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेती निगडित विविध योजनांकरिता वेगवेगळे अर्ज करावे लागत होते. आता या प्रणालीद्वारे एकच अर्ज करायचा आहे. त्या अर्जावर वैयक्तिक मोबाईल क्रमांक व आधारकार्ड संलग्न करणे आवश्यक आहे.

महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.go.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. मोबाईल, संगणक, लॅपटाॅप, टॅब्लेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायत संग्राम केंद्र आदी माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल. वैयक्तिक लाभार्थी म्हणून ही नोंदणी करता येणार आहे.

कशी कराल नोंदणी?

संकेतस्थळावर गेल्यानंतर शेतकरी योजना हा पर्याय निवडायचा. त्यानंतर अर्ज भरून घ्यायचा. वैयक्तिक लाभार्थी म्हणूनही नोंदणी करता येईल. आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नाही, त्यांनी आधार केंद्राकडे जाऊन नोंदणी करुन क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करावा. अनुदान वितरित करण्यापूर्वी आधार क्रमांक प्रमाणित करून घ्यावा लागेल.

महाडीबीटीवर नोंदणी

महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यापूर्वीच अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची गरज नाही. मात्र, लाभाच्या घटकांमध्ये बदल करता येऊ शकतो. कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्यांनी अर्ज केला नाही, त्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. या तारखेपर्यंत सर्व अर्ज लाॅटरीसाठी ग्राह्य धरले जातील. - दत्तात्रय गावसाने,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

अर्ज भरण्यास संभ्रम

महाडीबीटी पोर्टलमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाचे असले तरी काय योजना, कोठे अर्ज करायचा, त्यासाठी लागणारी कागदपत्रे यासंदर्भात कसलीच माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यासाठी योजनेची जनजागृती करून ३१ डिसेंबरची मुदत वाढवावी व स्वत: कृषी कर्मचाऱ्यांनी अर्ज भरून घ्यावेत. जेणेकरून अडचण होणार नाही.

- राजकुमार सस्तापुरे,

शेतकरी संघटना

या योजनांसाठी आता लागणार एकच अर्ज

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना.

Web Title: Registration of 7872 farmers in the district on MahaDBT portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.