मृतदेहासह नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, तिघांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 09:23 PM2022-09-28T21:23:22+5:302022-09-28T21:24:13+5:30

राजकुमार जोंधळे  उदगीर (जि. लातूर ) - महिलेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी मयत महिलेच्या नातेवाईकांनी ...

Relatives with the dead body stood in front of the police station, a case was filed against the three in latur | मृतदेहासह नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, तिघांविरोधात गुन्हा

मृतदेहासह नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, तिघांविरोधात गुन्हा

Next

राजकुमार जोंधळे 

उदगीर (जि. लातूर) - महिलेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी मयत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसह मृतदेह उदगीर शहर पोलीस ठाण्यासमोर ठेवत बुधवारी दुपारी ठिय्या मांडला. याबाबत उदगीर शहर पाोलीस ठाण्यात तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, ॲट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत नातेवाईकांची समजूत काढली, त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी माघार घेतली.

पोलिसांनी सांगितले, मयत महिलेचे पतीसोबत जमत नसल्याच्या कारणावरुन सहा महिन्यांपूर्वी त्यांचे बिनसले होते. त्यामुळे सध्या ती आपल्या आईकडे वास्तव्याला होती, तर कौळखेड येथील संगमेश्वर राजकुमार पाटील याच्यासोबत मयत महिलेची ओळख झाली होती. दरम्यान, तो मयत महिलेला त्रास देत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. याबाबत त्यास वेळोवेळी समज दिली. मात्र, त्याच्या वागण्यात, बोलण्यात काहीही फरक पडला नाही. शेजारी राहणारी रेखा उर्फ शमीम महमूद पठाण उर्फ बेंद्रे, अनिल उर्फ सलमान हे दोघे तिला वेळोवेळी शिवीगाळ करुन छळत करत होते. अखेर या त्रासाला, छळाला कंटाळून महिलेने मंगळवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात पत्र्याखालील लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. अशी तक्रार मयत महिलेच्या आईने पोलिसांत दिली आहे. 

याबाबत उदगीर शहर पोलीस ठाण्यात संगमेश्वर राजकुमार पाटील, रेखा बेंद्रे उर्फ शमीम मेहमूद पठाण आणि अनिल उर्फ सलमान याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत करणे, अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रासिटी) बुधवारी दुपारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन तपास करत आहेत.
 

Web Title: Relatives with the dead body stood in front of the police station, a case was filed against the three in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.