दिलासादायक! लातूरमध्ये मनपाच्या तीनशे बोअरचे पुनर्भरण; पाणीपातळीत वाढ

By हणमंत गायकवाड | Published: December 30, 2023 05:53 PM2023-12-30T17:53:13+5:302023-12-30T17:54:12+5:30

लातूरमध्ये १३० हातपंप नादुरुस्त, ४० विद्युत पंप कायमचे बंद

relief ! Replenishment of 300 Municipal Boars in Latur; Rise in water level | दिलासादायक! लातूरमध्ये मनपाच्या तीनशे बोअरचे पुनर्भरण; पाणीपातळीत वाढ

दिलासादायक! लातूरमध्ये मनपाच्या तीनशे बोअरचे पुनर्भरण; पाणीपातळीत वाढ

लातूर : मागील तीन महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या ३०० बोअरचे पुनर्भरण करण्यात आले असून, यामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. शिवाय, पावसाळ्यापूर्वीच ८० बोअरचे पुनर्भरण करण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने विद्युत पंप व हातपंपाच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले आहे. १०६१ विद्युत पंप व २५४ हातपंपापैकी एकूण एक हजार शंभर बोअरद्वारे नागरिकांना पाणी मिळत आहे.

यंदाच्या पावसाळ्यामध्ये मांजरा प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा झाला नाही सद्य:स्थितीत २० टक्के जिवंत पाणीसाठा आहे या पाण्यावरच लातूर शहरासह अन्य शहराला मांजरा प्रकल्पातून पुरवठा होणार आहे. लातूर शहरासाठी दररोज ४० ते ५० एमएलडी पाणी प्रकल्पातून उचलले जाते. त्यावरचा थोडासा ताण कमी व्हावा, या हेतूने लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हातपंप व विद्युत पंपाच्या दुरुस्तीला प्राधान्य देऊन जिथे पाणी आहे, तिथे पंप सुरू केले आहेत. त्यानुसार शहरात सद्य:स्थितीत ९७६ विद्युत पंप आणि १२४ हातपंप सुरू आहेत. त्यातून नागरिकांना पाणी मिळते.

लातूर शहरातील विद्युत पंप व हातपंपाची स्थिती....
लातूर शहरांमध्ये १०६१ विद्युत पंप आहेत. त्यापैकी ९७६ चालू आहेत, तर ४० विद्युत पंप कायमचे बंद असून, २५ विद्युत पंप वापरात नाहीत. शिवाय, वीस पंपामध्ये काही ना काही अडकून बंद पडले आहेत, तर २५४ हातपंपांची संख्या असून, यातील १२४ सद्य:स्थिती चालू आहेत. १३० हातपंप नादुरुस्त असून, फक्त १२४ पंपाचेच पाणी नागरिकांना घेता येत आहे.

मांजरा प्रकल्पात २० टक्के जिवंत पाणीसाठा.....
लातूर शहरासाठी मांजरा प्रकल्प महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातूनच शहराला पाणीपुरवठा आहे. मात्र यंदा पाऊस काळ चांगला झाला नाही. त्यामुळे प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ २०.२८ टक्के पाणीसाठा आहे. म्हणजे ३५.२२८ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. जूनअखेरपर्यंत पाणी पुरवू शकते. त्यासाठीच महानगरपालिकेने थोडा आधार व्हावा म्हणून शहरातील सर्व हातपंप व विद्युत पंप सुरू केले आहेत. शिवाय, काही बोअरचे पुनर्भरण करून पाणीपातळीत वाढ करण्याचाही प्रयत्न केला आहे.

नादुरुस्त १३० हातपंपाची दुरुस्ती होणार
महापालिकेच्या अंतर्गत एकूण २५४ हातपंप आहेत. त्यापैकी १२४ हातपंप सुरू आहेत. १३० नादुरुस्त आहेत. त्यांची ही दुरुस्ती करण्यात येत आहे. तसेच वापरात नसलेल्या २५ विद्युत पंपाची दुरुस्ती होणार आहे. ज्यामुळे टंचाईत याचा फायदा होईल. त्यानुषंगाने लातूर महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

Web Title: relief ! Replenishment of 300 Municipal Boars in Latur; Rise in water level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.