रेणापूर तालुक्याला वादळी वारा अन् पावसाने झाेडपले; शेतकऱ्यांना दिलासा

By राजकुमार जोंधळे | Published: June 8, 2024 09:55 PM2024-06-08T21:55:32+5:302024-06-08T21:55:50+5:30

शुक्रवारी मृर्ग नक्षत्र निघाला असून, या नक्षत्राच्या दुसऱ्याच दिवशी माेठा पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांत पेरणीसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवजुळव सुरु हाेती

Renapur taluka was hit by stormy wind and rain; Relief to farmers | रेणापूर तालुक्याला वादळी वारा अन् पावसाने झाेडपले; शेतकऱ्यांना दिलासा

रेणापूर तालुक्याला वादळी वारा अन् पावसाने झाेडपले; शेतकऱ्यांना दिलासा

रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील काही गावांना शनिवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने झाेडले आहे. गत दाेन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने शेत-शिवारात सर्वत्र पाणीचपाणी थांबल्याले आहे. तर रेणापूर येथे जवळपास ३० मिनिटापेक्षा अधिक वेळ जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

रेणापूरसह तालुक्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. त्यानंतर रेणापूरसह तालुक्यात मोठा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची एकच तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळे शेत-शिवारात सर्वत्र पाणीच-पाणी थांबल्याचे चित्र दिसून आले. शनिवारी झालेल्या पावसामुळे सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी पाच वाजता सुरु झालेला पाऊस सहापर्यंत होता. दरम्यान, रात्रीही रिमझिम सुरूच हाेती. शुक्रवारी मृर्ग नक्षत्र निघाला असून, या नक्षत्राच्या दुसऱ्याच दिवशी माेठा पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांत पेरणीसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवजुळव सुरु हाेती. येत्या काही दिवसात अधिक पाऊस पडेल, अशी अशा शेतकऱ्यांना आहे.

ब्रह्मवाडीत वीज पडल्याने म्हैस ठार...

रेणापूर तालुक्यातील ब्रह्मवाडी शिवारात शनिवारी संध्याकाळी झालेल्या पावसात वीज पडून म्हैस ठार झाल्याची घटना घडली. या घटनेने सूर्यकांत लक्ष्मण माने यांचे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Renapur taluka was hit by stormy wind and rain; Relief to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.