जिल्ह्यात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:22 AM2021-02-05T06:22:42+5:302021-02-05T06:22:42+5:30
किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात संस्था सचिव प्राचार्य डॉ. भारत भदाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्रा. बालाजी आचार्य, ...
किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात संस्था सचिव प्राचार्य डॉ. भारत भदाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्रा. बालाजी आचार्य, प्रा. बळीराम पवार, प्रा. अनंत सोमवंशी, प्रा. विष्णू पवार आदी उपस्थित होते.
भगवान विद्यालयात मुख्याध्यापक दिनकर मुंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी दत्तात्रय दहिफळे, मदन कराड, एस. पी. मुंढे, सुभाष रुद्राक्ष, कविता माळी, केशव तांदळे, बंकट दराडे आदींची उपस्थिती होती.
संत मोतीराम महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य सागरताई घुले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब मुंढे, प्रा. प्रमेश्वर भोसले, मारुती गिते, प्रा. रामेश्वर मुंढे, एस. एन. देवनाळे, नागनाथ फड आदींची उपस्थिती होती.
भागिरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य संभाजी मुरकुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी दौलत मुंडे, वैजिनाथ मुरकुटे, प्रा. जफर शेख, रमेश सूर्यवंशी, बालासाहेब मुंडे, प्रियदर्शनी मोरे, कृष्णा वाघमारे आदींची उपस्थिती होती.
वसंतराव नाईक प्राथमिक आश्रमशाळेत मुख्याध्यापक प्रशांत गुळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी शिवय्या स्वामी, विवेकानंद जांबळदरे, ज्ञानेश्वर मडके, अमोल तिडके आदींची उपस्थिती होती.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच किशोर मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी धम्मानंद कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. पोलीस ठाण्यात सपोनि. के. एन. चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
सोनखेड- मानखेड येथील नूतन जनता माध्यमिक विद्यालयात प्राचार्य शिवाजीराव दहिफळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.