ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गाव पुढा-यांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:16 AM2020-12-26T04:16:22+5:302020-12-26T04:16:22+5:30

उदगीर : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यामुळे कडाक्याच्या थंडीतही गाव पातळीवरील राजकीय वातावरण तापू लागले आहे. ...

The reputation of the village leaders for the Gram Panchayat elections has been tarnished | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गाव पुढा-यांची प्रतिष्ठा पणाला

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गाव पुढा-यांची प्रतिष्ठा पणाला

Next

उदगीर : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यामुळे कडाक्याच्या थंडीतही गाव पातळीवरील राजकीय वातावरण तापू लागले आहे. ग्रामपंचायतीत आपलेच वर्चस्व ठेवण्यासाठी स्थानिक पुढा-यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दरम्यान, यापूर्वीचे सरपंच पदाचे आरक्षण शासनाने रद्द करून निवडणुकीनंतर ते काढण्याचे ठरविल्याने निवडणुकीची तयारी करणा-या गाव पुढा-यांची गोची झाली आहे. परिणामी पॅनल टू पॅनल निवडणूक लढविण्यावर भर दिला जात आहे.

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच गाव पुढा-यांनी आपली कंबर कसली असून पॅनलची जुळवा- जुळव करण्यात कार्यकर्ते मग्न झाले आहेत. नवीन आदेशाची अंमलबजावणी झाल्याने पॅनल प्रमुखांना आपले पॅनल निवडून आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. या निवडणुकीत तरुण व नवीन चेहरे निवडणुकीच्या फडात उतरविण्याची तयारी पॅनल प्रमुख करीत आहेत. तालुक्यातील अवलकोंडा, आडोळवाडी, आरसनाळ, इस्मालपूर, एकुर्का रोड, करखेली, करडखेल, करवंदी, कासराळ, किनी यल्लादेवी, कुमठा (खु.), कुमदाळ उदगीर, कुमदाळ हेर, कोदळी, कौळखेड, क्षेत्रफळ, खेर्डा (खु.), गंगापूर, गुडसूर, गुरधाळ, चांदेगाव, चिघळी, जकनाळ, जानापूर, टाकळी वागदरी, डांगेवाडी, डाऊळ हिप्परगा, डोंगरशेळकी, तादलापूर, दावणगाव, धडकनाळ, धोंडीहिप्परगा, नळगीर, निडेबन, पिंपरी, बामणी, बेलसकरगा, बोरगाव (बु.), भाकसखेडा, मल्लापूर, मांजरी, मादलापूर, माळेवाडी, येणकी, रूद्रवाडी, लिंबगाव, लोणी, लोहारा, वागदरी, वाढवणा (बु.), वाढवणा (खु.), शिरोळ जानापूर, शेल्हाळ, सुमठाणा, हंगरगा कुदर, हंडरगुळी, हकनकवाडी, हाळी, हिप्परगा डाऊळ, हेर, होनीहिप्पगा आदी ६१ गावांत निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.

या निवडणुकीसाठी एकूण ५४३ प्रभागातून १ लाख ३ हजार ५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून १ हजार ६२९ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत, अशी माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे, निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली.

प्रथमच ऑनलाईन नामनिर्देशन पत्र...

या ग्रामपंचायत निवडणुकीत ऑनलाईन नामनिर्देशन पत्र महा- ई- सेवा केंद्रात दाखल करून घेण्यात येत आहेत. प्रथमच ऑनलाईन दाखल होत असलेल्या या अर्जाची प्रिंट व डिपॉझिट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावे लागणार आहे. त्यामुळे अर्ज विकत घेण्याची गरज नाही. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व एक वर्षात जात पडताळी समितीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे स्वयंघोषणा पत्र सादर करणे बंधनकारक आहे. अशी माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे व निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली.

तालुक्यातील दिग्गजांची प्रतिष्ठ पणाला...

तालुक्यातील दिग्गज नेते मंडळींच्या गावात निवडणूक होत असल्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ. गोविंद केंद्रे, जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील केंद्रे (कुमठा खु.), कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील (हाळी), भाजपाचे प्रदेश सचिव नागनाथ निडवदे, बाजार समितीचे संचालक पद्माकर उगिले (नळगीर), माजी समाजकल्याण सभापती मधुकर एकुर्केकर (एकुर्का रोड), महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, जि. प. सदस्य बसवराज पाटील कौळखेडकर (कौळखेड), माजी पं. स. सभापती सत्यकला गंभीरे (करवंदी), पं. स. सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, जि. प. सदस्या आशाताई ज्ञानेश्वर पाटील (दावणगाव), माजी पं. स. सभापती संगम आष्टुरे, माजी पं. स. सदस्य दत्तात्रय बामणे (वाढवणा बु.), पं. स. उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले (डोंगरशेळकी), माजी पं. स. उपसभापती रामदास बेंबडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहिदास कुंडगीर (इस्मालपूर) आदींची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती बिनविरोध निघाव्यात म्हणून प्रमुख राजकीय पक्षांकडून फिल्डिंग लावली जात आहे. या प्रयत्नाला किती यश येईल, हे लवकरच समजणार आहे.

Web Title: The reputation of the village leaders for the Gram Panchayat elections has been tarnished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.