पंचायत समितीचे आरक्षण जाहीर
By Admin | Published: August 26, 2014 12:19 AM2014-08-26T00:19:42+5:302014-08-26T00:19:42+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समितीच्या विद्यमान सभापती व उपसभापतींचा कार्यकाळ येत्या सप्टेंबर महिन्यात संपत आहे़
लातूर : लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समितीच्या विद्यमान सभापती व उपसभापतींचा कार्यकाळ येत्या सप्टेंबर महिन्यात संपत आहे़ दरम्यान, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय इमारतीच्या नियोजन समितीच्या सभागृहात सोमवारी आरक्षणाची सोडत करण्यात आली़ त्यात लातूर पंचायत समितीचे सभापतीपद अनुसुचित जातीसाठी आरक्षित झाले असून चाकूर, अहदपूर पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे़
अप्पर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली़ शिवरी लिंबराज हजारे या दहा वर्षाच्या मुलाकडून चिठ्ठ्या काढून ही सोडत काढण्यात आली़ यावेळी लातूर अनुसुचित जातीसाठी, औसा-महिला, निलंगा-महिला, रेणापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, उदगीर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, चाकूर- खुला प्रवर्ग, शिरूर अनंतपाळ- अनुसुचित जाती महिला, देवणी- नागरिकांचा मागास प्रवर्ग, जळकोट- सर्वसाधारण महिला, अहमदपूर- खुला प्रवर्गासाठी पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहिर झाले आहे़
यावेळी निवासी उपजिल्हाकारी विश्वंभर गावंडे, उपजिल्हाधिकारी डॉ़ अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी डॉ़ प्रताप काळे, तहसीलदार रूपाली चौैगुले, पेशकार विजय कांबळे आदींची उपस्थिती होती़
भातांगळी गणातील काँग्रेसचे भालेराव अनुसुचित जाती प्रगर्वातील एकमेव पुरूष पंचायत समिती सदस्य आहेत़ या पंचायत समितीत काँग्रेसचे वर्चस्व असल्याने आरक्षणाची सोडत जाहिर होताच रावसाहेब भालेराव यांना अनेकांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या़ तसेच काहींनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले़ (प्रतिनिधी)
लातूर-अनुसुचित जाती, औसा, निलंगा- महिला, उदगीर, देवणी, रेणापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, शिरूर अनंतपाळ- अनुसुचित जाती महिला, अहमदपूर, चाकूर- खुला प्रवर्ग, जळकोट-सर्वसाधारण महिला़
४सध्याचे आरक्षण- लातूर पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या प्रवर्गातील महिला, औसा- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, चाकूर, निलंगा- नागरिकांचा मागास प्रवर्ग, रेणापूर- खुल्या प्रवर्ग महिला, उदगीर- अनुसुचित जाती, देवणी, शिरूरअनंतपाळ- खुला प्रवर्ग, जळकोट- अनुसुचित जाती महिला, अहमदपूर- खुला प्रवर्ग महिला़
आरक्षणाची सोडत जाहीर होताच इच्छुकांनी सभापती व उपसभापतीपद मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे़ लातूर पंचायत समिती अनुसुचित जातीला जाहीर झाले आहे़ लातूर पंचायत समितीच्या भातांगळी गणातून निवडून आलेले रावसाहेब भालेराव हे एकमेव आहेत़ त्यामुळे त्यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे़ यदाकदाचित महिलेला संधी दिल्यास कव्हा व तांदुळजा, भातांगळी गणातून स्पर्धा होईल़