लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर
By admin | Published: January 11, 2017 05:48 PM2017-01-11T17:48:04+5:302017-01-11T17:48:04+5:30
जिल्ह्यातील दहाही पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण रोटेशन पद्धतीने जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण
Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि.11 - जिल्ह्यातील दहाही पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण रोटेशन पद्धतीने जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत बुधवारी प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात काढण्यात आली. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३, अनुसूचित जातीसाठी २ आणि खुल्या प्रवर्गासाठी ५ सभापती पदांसाठी ही सोडत झाली.
लोकसंख्येच्या चढत्या क्रमानुसार अनुसूचित जातीसाठी आरक्षण काढण्यात आले. ज्या ठिकाणी यापूर्वी आरक्षण होते, त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी सभापतीपद सोडण्यात आले. त्यानुसार देवणी आणि चाकूर येथे अनुसूचित जातीसाठी सभापतीपद आरक्षित झाले. देवणी व चाकूर सभापती पदासाठी अनुसूचित जातीतील महिलेसाठी लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. या चिठ्ठीतून चाकूर सभापतीपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी सुटले. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीही लोकसंख्येच्या चढत्या क्रमानुसार आरक्षण काढण्यात आले. त्यात अहमदपूर, जळकोट आणि लातूर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सभापतीपद सुटले. त्यात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी चिठ्ठी काढण्यात आली असून, अहमदपूर व लातूर पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले. अनुसूचित जातीसाठी देवणी, चाकूर आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी अहमदपूर, जळकोट आणि लातूर सभापतीपदाचे आरक्षण काढल्यानंतर उर्वरित शिरूर अनंतपाळ, निलंगा, औसा, उदगीर आणि रेणापूर पंचायत समिती सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले. खुल्या प्रवर्गातील या पाच पंचायत समितीच्या सभापती पदातून चिठ्ठ्या काढून खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी शिरूर अनंतपाळ आणि उदगीर पंचायत समितीचे सभापतीपद आरक्षित झाले.
असे आहे आरक्षण...
पंचायत समिती प्रवर्ग
देवणी अनु.जाती पुरुष
चाकूर अनु. जाती महिला
अहमदपूर नामाप्र. महिला
लातूर नामाप्र. महिला
जळकोट नामाप्र. पुरुष
शिरूर अनंतपाळ सर्वसाधारण महिला
निलंगा सर्वसाधारण पुरुष
औसा सर्वसाधारण पुरुष
उदगीर सर्वसाधारण महिला
रेणापूर सर्वसाधारण पुरुष
सध्या चालू असलेले आरक्षण...
पंचायत समिती प्रवर्ग
शिरूर अनंतपाळ अनु. जाती महिला
लातूर अनु. जाती पुरुष
उदगीर नामाप्र. महिला
देवणी नामाप्र. पुरुष
रेणापूर नामाप्र. पुरुष
जळकोट सर्वसाधारण महिला
निलंगा सर्वसाधारण महिला
औसा सर्वसाधारण महिला
अहमदपूर सर्वसाधारण पुरुष
चाकूर सर्वसाधारण पुरुष