रेणापूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:22 AM2021-02-05T06:22:26+5:302021-02-05T06:22:26+5:30
उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या उपस्थितीत आणि सुमित नेताजी चव्हाण या मुलाच्या हस्ते सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार राहुल ...
उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या उपस्थितीत आणि सुमित नेताजी चव्हाण या मुलाच्या हस्ते सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार राहुल पाटील, सहायक गटविकास अधिकारी संजय गोस्वामी, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार गोविंद येरमे, विस्तार अधिकारी गोविंद काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वसाधारण प्रवर्ग : आनंदवाडी, आरजखेडा, भोकरंबा, बिटरगाव, दवणगाव, फरदपूर, कामखेडा, कारेपूर, खरोळा, माकेगाव, मोरवड, मोटेगाव, मुरढव, फावडेवाडी, सारोळा, वांगदरी, यशवंतवाडी.
सर्वसाधारण प्रवर्ग महिला : बावची, भंडारवाडी, घनसरगाव, गोढाळा, ईटी, खानापूर, माणूसमारवाडी, निवाडा, पोहरेगाव, समसापूर, सय्यदपूर, सिंधगाव, टाकळगाव, तळणी, तत्तापूर.
दर्जी बोरगाव, पळशी, पाथरवाडी ओबीसीसाठी...
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : आंदलगाव, आसराचीवाडी, हरवाडी, खलंग्री, पानगाव, रामवाडी (पा.), सेलू, शेरा, वंजारवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष : दर्जी बोरगाव, डिघोळ देशमुख, दिवेगाव, गरसुळी, कोष्टगाव, पळशी, पाथरवाडी, रामवाडी (ख.), व्हटी, सायगाव.
अनुसूचित जाती प्रवर्ग महिला : चाडगाव, धवेली, जवळगा, कुंभारी, सांगवी, सुमठाणा, वाला.
अनुसूचित जाती प्रवर्ग पुरुष : गव्हाण, इंदरठाणा, कोळगाव, मोहगाव, मुसळेवाडी, नरवटवाडी.