जिव्हाळा ग्रुपच्या लसीकरणास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:20 AM2021-09-25T04:20:15+5:302021-09-25T04:20:15+5:30
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश अंबरखाने होते. यावेळी जिल्हा ...
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश अंबरखाने होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रेय पवार, सोपानराव माने यांची उपस्थिती होती. निडेबन येथील डॉ. राधाकृष्णन शाळेत पार पडलेल्या या शिबिरात १८० जणांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष देविदास नादरगे, संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ मुडपे, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने, अशोक हाळे, नवनाथ पाटील, चंद्रकांत रोडगे, वैजनाथ पंचगल्ले, लक्ष्मीकांत बिडवई, दशरथ शिंदे, पांडुरंग बोडके, अमृत देशपांडे, चंद्रकांत पांचाळ, ज्ञानोबा कुंडगीर, सचिन बापुरे, प्रशांत पांचाळ, रोहित बिरादार, शशिकांत पाटील, प्रफुल्लता बोडके, वर्षाताई पाटील यांनी पुढाकार घेतला.