स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मिस कॉल मोहिमेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:21 AM2021-09-27T04:21:13+5:302021-09-27T04:21:13+5:30
रविवारी मुरुड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मिस कॉल मोहीम राबविण्यात आली. शहर व परिसरातील २ हजार शेतकऱ्यांनी मिस कॉल ...
रविवारी मुरुड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मिस कॉल मोहीम राबविण्यात आली. शहर व परिसरातील २ हजार शेतकऱ्यांनी मिस कॉल करून उसाच्या एफआरपीसंदर्भातील निर्णयावर आपला रोष व्यक्त केला. उसाला एकरकमी भाव मिळावा, अन्यथा पुढील काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठीशी उभे राहून शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष धर्मराज पाटील, विधी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार जाधव, लातूर तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, उस्मानाबादचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विष्णुदास काळे, उस्मानाबाद जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत समुद्रे, लातूर तालुका युवा अध्यक्ष सुदाम कदम, मधुकर महेंद्र, संतोष सोनपेठकर, रामा मायंदे, अध्यक्ष राजाराम शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रकाश सोनपेठकर, संदिपान वीर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.