हासेगाव डी फार्मसीचा निकाल शंभर टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:44 AM2021-09-02T04:44:09+5:302021-09-02T04:44:09+5:30
महाविद्यालयातील एकूण ६८ पैकी ४२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर २६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. देवानंद जाधव याने ...
महाविद्यालयातील एकूण ६८ पैकी ४२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर २६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. देवानंद जाधव याने ९१.७३ टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक मिळविला. साक्षी हुलसूरकर हिने ८९ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला. स्नेहल जाधव हिने ८८.३६ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, सचिव वेताळेश्वर बावगे, प्राचार्या डॉ. श्यामलीला बावगे जेवळे आदी उपस्थित होते. गुणवंतांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकरअप्पा बावगे, उपाध्यक्षा जयदेवी बावगे, प्राचार्य नंदकिशोर बावगे, प्राचार्य रबिक खान, प्राचार्या योगिता बावगे, मुख्याध्यापक कालिदास गोरे, मुख्याध्यापक आनंद शेंडगे, अनंत लांडगे, प्राचार्य सतीश गायकवाड आदींनी केले.